चोपडा (तालुका प्रतिनीधी)- तालुक्यातील चौगाव येथे 75 व्या भारतीय स्वातंत्र्य दिनािमित्ताने कोविड 19 च्या सर्व नियमांचे पालन करून ध्वजारोहण करण्यात आले.ग्राम पंचायत कार्यालयात सरपंच सुनंदाबाई केशव कोळी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले ,जि.प.प्रा.शाळेत शिक्षण समितीचे अध्यक्ष रितेश धनगर यांच्या पुर्वसुचनेने ग्रामपंचायत सदस्य पिरण ओंकार भिल यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले तर वि का सोसायटी कार्यालयात संस्थेचे व्हा.चेअरमन जगन्नाथ नारायण धनगर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.कार्यक्रमाला उपसरपंच कमलबाई राजाराम पाटिल सहीत सर्व ग्राम पंचायत सदस्य,शिक्षण समितीचे सदस्य,वि.का.सोसायटीचे सदस्य,इतर समित्यांचे सर्व पदाधिकारी,तसेच तलाठी,ग्रामसेवक,आरोग्य सेवक,मुख्याध्यापक,सर्व शिक्षक बंधू,अंगणवाडी सेविका,मदतणीस,आशा वर्कर,ग्राम पंचायत कर्मचारी ,रोजगार सेवक व गावातील सर्व कर्मचारी उपस्थीत होते.
ध्वजारोहणाच्या कार्यक्रमात मास्क, सुरक्षित अंतर व सँनिटायझर यांचे काटेकोरपणे पालन करण्यात आले.








