जामनेर;- तालुक्यातील पहूर येथील ग्रुप एज्युकेशन संचालित आर टी लेले हायस्कूल तसेच ज्युनिअर महाविद्यालयशाळेचा 63 वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या सुरुवातीला शाळेचे संस्थापक अध्यक्ष किसन ठमाजी पाटील संस्थेचे संस्थापक डॉक्टर कॅप्टन एम आर लेले लेलेसरस्वती देवीची प्रतिमा पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी येथील हेमंत दादा जोशी हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून माजी जीप सदस्य राजधर पांढरे, कृषी सभापती संजय देशमुख ,संस्थेचे व्हाईस चेअरमन साहेबराव देशमुख, जिल्हा परिषदसदस्य अमित देशमुख, माजी पंचायत समिती सभापती बाबुराव घोंगडे, शिवसेना तालुका प्रवक्ता गणेश पांढरे, उपसरपंच राजू जाधव ,योगेश भडांगे, उत्तर महाराष्ट्र धनगर समाजप्रमुख रामेश्वर पाटील, अशोक पाटील ,माजी मुख्याध्यापक विलासजी भालेराव, बडगुजर सर, खाजोडकर सर ,दौलत मामा घोलप, ॲड संजय पाटील चेतन रोकडे आदि मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. शाळेतील प्राविण्य मिळवल्या विद्यार्थी व विद्यार्थिनी यांना बक्षीस वितरण करण्यात आलेयाप्रसंगी ॲड संजय पाटील राजधर पांढरे रामेश्वर पाटील शरद बैलपत्रे अध्यक्षस्थानी भाषणं हेमंत दादा जोशी यांनी केले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालय चे मुख्याध्यापक आर बी पाटील. सुत्रसंचलान शिक्षक रविंद्र देशमुख तर आभार एस व्ही पाटील यांनी मानले. यावेळी शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते तसेच शाळेतील विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षीका व शिक्षिका तसेच कर्मचारी उपस्थित होते.