जळगाव;- भुसावळात एका ३५वर्षीय तरुणाने तापी नदीच्या पात्रात उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. धनंजय सुनील आंबोळकर (वय ३५) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी शहर पोलीस स्टेशनला याची नोंद करण्यात आली आहे.
भुसावळ शहरातील जुना सातारा परिसरातल्या कोळीवाड्यातील रहिवासी धनंजय आंबोळकर हा एका फायनान्स कंपनीत कामाला होता. दरम्यान, आज सकाळी त्याने तापी नदीच्या पात्रात उडी घेऊन आत्महत्या केली. त्याने आत्महत्या का केली याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही.








