जळगाव (प्रतिनिधी ) तालुक्यातील भादली येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत जळगांव येथील डॉ.उल्हास पाटील कृषी महाविद्यालयातील कृषिदूत हेमंत रवींद्र खडसे यांनी ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमाद्वारे शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. तेव्हा फळांची मूल्यवर्धित उत्पादने तयार करण्याचे, दुग्धजन्य पदार्थ तयार करण्याबाबत ,तसेच मोबाईल अँप चा वापर करून आधुनिक शेती , शेतकऱ्यानं साठी कर्ज प्रस्ताव याबद्दल मार्गदर्शन केले.यावेळी गावातील प्रगतिशील शेतकऱ्यांनी व प्रतिष्टीत नागरिकांनी त्यांच कौतुक केले.यासाठी त्याला डॉ.उल्हास पाटील कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य.शैलेश तायडे सर,उपप्राचार्य.पी.एस. देवरे , कार्यक्रम समनव्यक प्रा.ए. डी. फाफळे ,कार्यक्रम अधिकारी प्रा.बी.बी.मुंडे विषयतज्ञ प्रा. एस. बी. इंगोले आणि प्रा. ए. एम. गावंडे यांचे मार्गदर्शन लाभले.