जळगाव (प्रतिनिधी ) ;- २० लाखांचे सॅनिटायझर खरेदी प्रकरण आणि १०,२०,३० च्या कालबद्ध पदोन्नतीवरून आज आरोग्य सभापती रवींद्र पाटील यांच्या दालनात आरोग्य समितीची सभा गाजली . या आरोग्य समिती सभेत आरोग्य सभापती रवींद्र पाटील, यांच्या अध्यक्षतेखाली आज दुपारी २ वाजता घेण्यात आली.

या सभेत जिल्हा परिषद सदस्य अमित देशमुख यांनी सॅनिटायझर खरेदी करतांना यात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला. सॅनिटायझर सॅम्पल प्रयोग शाळेत तपासणीसाठी कोणते पाठविण्यात आले ? . यासभेमध्ये औषध निर्माण अधिकारी यांनी कुणाचीही परवानगी न घेता अथवा वरिष्ठांना माहिती न देता परस्पर आपल्या स्वेच्छेने सॅनिटायझर बदलून घेतले. दुसरे चांगल्या प्रतीचे सॅम्पल उपल्बध करून घेऊन तपासणीसाठी पाठविले ,असा मुद्दा यावेळी उपस्थित झाला. यावेळी अमित देशमुख यांनी आरोग्य विभागाच्या कार्यक्षमतेवर प्रशचिन्ह उपस्थित करून तसेच सॅनिटायझर खरेदी कशी झाली असा खुलासा यावेळी मागविण्यात आला आहे. सॅनिटायझर उपलब्ध नसतांना सॅनिटायझर असल्याचा अहवाल कसा काय प्राप्त झाला असाही सवाल यावेळी जिल्हा आरोग्याधिकाऱ्याना विचारण्यात आला. कोरोना इतरांसाठी संकट असताना मात्र जिल्हा आरोग्य विभागासाठी पैसे कमविण्याचे साधन झाल्याचा आरोप अमित देशमुख यांनी केला आहे. यासंदर्भात जिल्हा परिषद सदस्य अमित देशमुख मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया यांना भेटून संबंधित सॅनिटायझर खरेदी प्रकरणातील दोषींवर कारवाईची मागणी करणार आहे.
आरोग्य विभागातील कर्मचारी अभावी १०,२०,३० च्या कालबद्ध पदोन्नत्या रखडल्या
जिल्हा परिषदेच्या इतर विभागांमध्ये १०,२०,३० च्या कालबद्ध पदोन्नत्या होतात. मग आरोग्य विभागाच्या पदोन्नत्या का रखडल्या असा सवाल जिल्हा परिषद सदस्या डॉ. नीलम पाटील यांनी विचारला असता जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. जमादार यांनी कर्मचारी संख्या कमी असल्याचे सांगितले. कर्मचाऱयांची संख्या पुरेशी झाल्यानंतर पदोन्नत्या करणार असल्याचे आश्वासन या सभेत दिले. या आरोग्य सभेला जिल्हा परिषद सदस्य विद्या खोडपे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भीमाशंकर जमादार , अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. पटोळे व तालुका आरोग्य विभागातील वैद्यकीय अधिकारी यांनी सहभाग घेतला. २० लाखांच्या सॅनिटायझर खरेदी प्रकरणात सॅनिटायझरमध्ये २० टक्के सॅनिटायझर व ८० टक्के पाणी असल्याचा आरोप जिल्हा परिषद सदस्याने केला होता.यावरून आज झालेल्या आरोग्य समितीच्या सभेत सॅनिटायझरच्या मुद्द्यांवरून आरोग्य अधिकाऱ्यांना धारेवर धरले.







