जळगाव ;- एरंडोल तालुक्यातील खर्ची येथे संपत्तीच्या वाटणीच्या वादातून बापासह लहान भावाला काठीने डोक्यात मारहाण करून गंभीर जखमी केल्याची घटना १२ रोजी सकाळी ११ वाजता घडली असून याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत माहिती अशी कि , राजाराम सोनार वय ८३ यांना चार मुले असून मुलगा कैलास सोनार यांच्यासोबत राहत असून त्यांचा मुलगा बाळू सोनार आणि सून सीमाबाई सोनार यांनी घराच्या वाटणीवरून वाद घालून राजाराम सोनार यांना काठीने मारहाण करून कैलास सोनार यांच्या डोक्यातही काठी टाकून त्याला गंभीर जखमी केल्याची घटना घडली . याप्रकरणी एरंडोल पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.