नांदेड – नांदेडमध्ये बॅनर लावण्याच्या कारणावरुन एका तरुणाचा सहा जणांनी खून केलाय. उमरी तालुक्यातील निमटेक येथे ही धक्कादायक घटना काल घडलीय. महेश पाटील असं मृत तरुणाचं नाव आहे.
महेश हा शेताकडून घराकडे जात असताना गावातीलच खुषाल पाटील, आदित्य पाटील, त्र्यंबक पाटील, शैलेश पाटील, मारोती पाटील यांनी रस्त्यात अडवून गावात बॅनर का लावलास म्हणत बॅट आणि काठ्याने मारहाण केली.
या मारहणीत महेश पाटील हा गंभीर जखमी झाला त्याला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले मात्र, जबर मार झाल्याने महेशचा मृत्यू झाला.. या प्रकरणी सहा आरोपींविरोधात उमरी पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. आरोपी फरार झाले आहेत.
नेमका काय प्रकार घडला?
मयत तरुण महेश हा आपल्या शेताकडून घराकडे दुचाकीवरुन येत होता… यावेळी गावात आल्यावर आरोपीने बॅनर लावण्याच्या कारणावरुन महेशला जबरदस्तीने आपल्या घरात नेऊन पकडून ठेवलं…. त्यातील एकाने डोक्यात बॅटने मारुन गंभीररीत्या जखमी केले. त्यामुळे महेश बेशुद्ध पडला. त्यानंतर त्याला उमरीच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र प्रकृती गंभीर असल्याने त्यास नांदेडच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला.
मात्र काही नातेवाईकांच्या आग्रहास्तव जखमी महेश यास तेलंगणा राज्यातील निजामबाद येथे एका खाजगी रुग्णायलात उपचारासाठी दाखल केले. उपचारादरम्यान 12 ऑगस्ट रोजी पहाटे महेशचा मृत्यू झाला.