जळगांव(प्रतिनिधी ) ;- कोकण ,कोल्हापूर,सांगली,सातारा आदी ठिकाणच्या पूरग्रस्तांना मदत व्हावी या उद्देशाने १० रोजी सायंकाळी साडेपाच वाजता मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना वर्षा बंगल्यावर मदतीचा धनादेश सुपूर्द करण्यात आला.. यावेळी जळगाव जिल्हा संपर्क प्रमुख संजय सावंत, जिल्हा प्रमुख डॉ. हर्षल माने, अपंग संघटनेचे राज्य अध्यक्ष रवींद्र पाटील, पारोळा शिवसेना माजी तालुका प्रमुख दौलत पाटील आदी उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी डॉ. हर्षल माने यांच्या कार्याचे कौतुक करून असेच कार्य सुरु ठेवा अशा सदिच्छा दिल्या.