लाखोंचे नुकसानाचा अंदाज ; एक अग्निशामक बंबाने आग आटोक्यात

जळगाव (प्रतिनिधी) – एमआयडीसी परिसरातील के. सेक्टर मधील एका ऑइल कंपनीला शॉर्टसर्किट मुळे भिषण आग लागल्याची घटना आज सायंकाळी ६:३० वाजेच्या सुमारास घडली असुन ही आग मनपाच्या एका अग्निशमन बंबाच्या मदतीने आटोक्यात आनण्यात आली. दरम्यान या आगीत कंपनीचे लाखोंचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. याबाबत एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये साडेसात वाजेपर्यंत कुठलीही नोद झालेली नव्हती
सुत्रांनी दिलेली माहिती असी की. जळगाव एमआयडीसी परिसरातील के. सेक्टर मध्ये असलेल्या नेहा इंडस्ट्रीज के. ८२/१ या ऑइल कंपनीला आज साडे सहा वाजेच्या सुमारास मेन्टेनन्स विभागात वेल्डिंग काम करत असताना शॉर्टसर्किट मुळे आग लागल्याची घटना घडली यात ऑइल हँड जळून खाक झाले असल्याचे समजले.यावेळी मनपाच्या अग्निशामक दलातील कर्मचारी वाहन चालक प्रकाश चव्हाण,पन्नालाल सोनवणे,गंगाधर कोळी,सोपान जाधव,नितीन बारी व नेहा इंडस्ट्रीज कंपनी मधील कर्मचाऱ्यांनी आगीवर नियंत्रण मिळविले आहे. याबाबत एमआयडीसी पोलीस पुढील तपास करीत आहेत







