जळगाव- राजनंदिनी बहुउद्देशिय संस्थेतर्फे गीतकार, गायिका सुरेखा माणकचंद पोरवाल यांना ‘नारीरत्न पुरस्कार 2021’ जाहीर झाला आहे. त्यांना या पुरस्काराचे लवकरच वितरण करण्यात येईल, अशी माहिती संस्थेच्या अध्यक्षा संदिपा वाघ यांनी कळविले आहे.
सुरेखा पोरवाल या आदर्शनगरातील रहिवासी असून त्या आदर्श माहेश्वरी महिला मंडळ, गायत्री भजनी मंडळ व जळगाव शहर आणि तालुका महिला संघटनेच्या पदाधिकारी आहेत. त्यांनी विविध सामाजिक, धार्मिक,
सत्संग कार्यक्रम अथवा अनेक प्रकारच्या गीतगायनाच्या स्पर्धेतही उल्लेखनीय यश संपादन केले आहे. त्या ‘बेटी बचाव, बेटी पढाव’ अभियानात जनजागृती करीत आहेत. त्यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गरजू रुग्णांसाठी आॅक्सिजन मशीन उपलब्ध करुन देण्यासाठी आर्थिक सहकार्य केले. लॉकडाऊनमुळे बेरोजगार झालेल्यांना सुद्धा धान्य, किराणा किट आदी स्वरुपात मदत केली आहे. त्यांचा गोशाळेतील अनेक कार्यक्रमांमध्ये सहभाग असतो. त्यांनी ‘बेटी आई है’ या शॉर्टफिल्ममध्ये काम केले आहे. पोरवाल ट्रेडींग कंपनीचे संचालक माणकचंद पोरवाल यांच्या त्या पत्नी आहेत. उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन त्यांना या पुरस्काराचे लवकरच वितरण करण्यात येणार आहे.