जळगाव (प्रतिनिधी ) ;- रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा, हे ब्रिद घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आणि प्रदेशाध्यक्ष ना. जयंत पाटील यांच्या संकल्पनेतून ‘राष्ट्रवादी वैद्यकीय सहाय्यता कक्ष’ सुरु करण्यात येत आहे. विविध शासकीय वैद्यकीय योजना तसेच दानशूर सेवाभावी संस्थांच्या माध्यमातून आर्थिक अडचणीतील गरजू रुग्णांना व अंपगांना मदत मिळवून देण्याचे काम या कक्षाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. आर्थिक अडचणीमुळे कोणत्याही रुग्णाचे उपचार थांबू नयेत, तसेच त्यांना योग्य उपचार मिळावेत यासाठी हा कक्ष कार्यरत असेल. राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री मा. राजेश टोपे आणि खासदार सुप्रियाताई सुळे यांचेही मार्गदर्शन या कक्षाला लाभणार आहे. राज्यातील सर्व २८८ विधानसभा मतदारसंघात हा कक्ष स्थापन करण्यात येईल. अशी माहिती राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष महानगरचे अभिषेक पाटील यांनी दिली.
‘राष्ट्रवादी वैद्यकीय सहाय्यता कक्षाची मदत घेण्यासाठी राष्ट्रवादी भवन, ठाकरसी हाऊस, जे एन हेरेडिया मार्ग, बेलार्ड इस्टेट, मुंबई – ४०००३८ येथे संपर्क साधावा असे आवाहन अभिषेक पाटील यांनी केले आहे.