गुवाहाटी(वृत्तसंस्था )एका व्यक्तीनं आपल्या अडीच वर्षाच्या मुलाला 40 हजारासाठी विकलं आहे. या बापानं ड्रग्ज (Drugs) घेण्यासाठी आपल्या मुलाला विकल्याचं समोर आलं आहे. ही धक्कादायक घटना आसाममधील आहे. आरोपीच्या पत्नीनं केलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी मुलाच्या बापाला आणि त्याला विकत घेणाऱ्या महिलेला अटक केली आहे. ही घटना आसामच्या गुवाहाटीपासून 80 किलोमीटर दूर असलेल्या मोरीगावच्या लहारीघाट येथे घडली आहे. इथे राहणाऱ्या अमीनुल इस्लाम नावाच्या व्यक्तीनं आपल्याच अडीच वर्षाच्या मुलाला साजिदा बेगम नावाच्या महिलेला विकलं. मुलाची आई रुकमिणा बेगमनं या घटनेची तक्रार पोलिसांत दिली. यानंतर पोलिसांनी अमीनुल आणि साजिदा या दोघांनाही अटक केली.