जाफ्राबाद (प्रतिनिधी ) ;- राज्यात होत असलेल्या विविध शासकीय नोकर भरतीमध्ये, NT प्रवर्गातील धनगर जमातीवर अन्याय करण्याची भूमिका शासन आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोग करीत असून हा अन्याय तात्काळ दूर करून ३.५ टक्के जागा दिल्या नाही तर, धनगर समाज संघर्ष समिती, राज्यात कुठेही परीक्षा होवू देणार नाही असे निवेदन मंञी ना. विजय वडेट्टीवार यांना दिले, यावेळी आमदार राजेशराठोड, डॉ. प्रकाशइंगळे आणि समाजबांधव उपस्थित होते.