• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

पाचोरा व भडगाव येथे दिव्यांग बांधवांसाठी तपासणी शिबिराचे आयोजन

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 6, 2021
in जळगाव, महाराष्ट्र
0

पाचोरा (प्रतिनिधी) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाचे निमित्ताने पाचोरा भडगाव तालुक्यात प्रथमच दिव्यांग बांधवांसाठी आ.किशोर पाटील यांच्या आमदार स्थानिक विकास योजने अंतर्गत प्रथमच जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र जळगाव यांच्या सहकार्याने सहाय्यक साहित्य वाटप करण्यासाठी पाचोरा व भडगाव तालुक्यात दि.१३ व १४ ऑगस्ट रोजी प्रथमच प्राथमिक तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. पाचोरा व भडगाव मतदार संघातील दिव्यांग व्यक्तींच्या आवश्यक सहाय्यक साहित्य व उपकरणे उपलब्ध करून देणेसाठी जिल्हा नियोजन समिती अंतर्गत रू १० लक्ष मंजुर केले असून सदर मंजुर निधीतून पाचोरा व भडगाव तालुक्यातील सर्व प्रवर्गातील दिव्यांग व्यक्तींना सर्व प्रकाराचे सहाय्यक साहित्य व उपकरणे उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती आ.किशोर अप्पा पाटील यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत दिली.
पुढे बोलतांना ते म्हणाले की,यासाहित्य वाटप कार्यक्रमाचे वैशिष्टय म्हणजे सर्व प्रकारातील दिव्यांग व्यक्तींच्या सर्वागीण शारिरीक पुनर्वसन होण्याच्या दृष्टीने विशेष पुनर्वसन तज्ज्ञांच्या शिफारशीनुसार अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुविद्य असे दर्जेदार, गुणवत्ता पुरक सहाय्यक साहित्य उपलब्ध व्हावे जेणेकरुन दिव्यांग व्यक्तींच्या व्याधीचे व अपंगत्वाचे प्रमाण कमी होण्यास तसेच त्यांचे दैनंदिन चलन वलन सोईचे होण्यासाठी मोलाची मदत होऊन त्यांच्यातील न्यूनगंड कमी होण्यास मदत होईल असा आशावादही त्यांनी व्यक्त केला.
आमदार किशोर अप्पा पाटील यांच्या विशेष प्रयत्नाने अशा प्रकाराचे दिव्यांग साहित्य वाटपाचे शिबीर प्रथमच मतदारसंघात होत असल्याने दिव्यांग बांधवात आनंद निर्माण झाला आहे.पाचोरा व भडगाव तालुक्यातील दिव्यांग बांधवांनी या शिबीरात दाखल होऊन लाभ घेण्याचे आवाहन आमदार किशोर अप्पा पाटील यांच्या वतीने करण्यात आले आहे.
सदर साहित्य उपलब्ध करून देण्यापुर्वी पात्र लाभार्थ्याची तज्ञांकडून मुल्यमापन व तपासणी शिबिराचे आयोजन जिल्हा रुग्णालय जळगाव व जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र जळगाव यांच्या वतीने भडगाव येथे शुक्रवार दि १३ ऑगष्ट रोजी शिवसेना कार्यालयात सकाळी १० वाजता तसेच शनिवार दि. १४ ऑगष्ट रोजी पाचोरा येथील भडगाव रोड वरील महालपुरे मंगल कार्यालयात सकाळी १० वाजता आयोजन करण्यात आले आहे.
सदर मुल्यमापन व तपासणी शिबिरात दिव्यांग प्रकारानुसार सहाय्यक साहित्य शिफारस केले जाणार आहे. दरम्यान पात्र लाभार्थ्यांनी सोबतअपंग प्रमाणपत्राची प्रत, आधार कार्डाची प्रत, ३ पासपोर्ट फोटो आणणे आवश्यक आहे.
या शिबिरात अस्थिव्यंग बांधवांसाठी तिनचाकी सायकल, व्हिल चेयर, कुबड्या, वॉकर, एलबो स्टिक, काठी, जयपुर फुट, कॅलीपर्स, आवश्यक ते सर्व कृत्रीम अवयव व सहाय्यक उपकरणे कर्णबधीर बांधवांसाठी डिजिटल कर्णयंत्र (जर्मन कंपनीचे) आवश्यकते नुसार इयर मोल्ड
अंध बांधवांसाठी इलेक्ट्रॉनिक्स अंध काठी, साधी अंध काठी, ब्रेल साहित्य मतीमंद वा गतीमंद बांधवांसाठी एमआर किट सेरेब्रल पाल्सी- एडीएल किट, सिटींग कॉर्नर चेयर, सि.पी चेयर इत्यादी साहित्यांचे वाटप करण्यात येणार आहे.या व्यतिरिक्त लाभार्थ्याच्या आवश्यकतेनुसार सहाय्यक साहित्य उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.
पत्रकार परिषदेला माजी जिल्हा उपप्रमुख गणेश पाटील, उपजिल्हाप्रमुख अभय पाटील, शिवसेनेचे जिल्हा परिषद गटनेते रावसाहेब पाटील,शहर प्रमुख किशोर बारावकर, उपनगराध्यक्ष गंगाराम पाटील, स्वीय सहाय्यक राजेश पाटील, प्रवीण ब्राह्मणे यांची उपस्थिती होती.


 

 

Previous Post

‘कोविड’मुळे पती गमावलेल्या महिलांच्या पुनर्वसनासाठी कृती आराखडा तयार करावा -डॉ.नीलम गोऱ्हे

Next Post

शेंदुर्णीत शिवसेना शाखेचे उद्घाटन

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

शेंदुर्णीत शिवसेना शाखेचे उद्घाटन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच
जैन कंपनी

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच

April 21, 2026
बसस्थानकात चोऱ्या सुरूच, आरोग्यसेविकेची सोनपोत लंपास
1xbet russia

जळगावात महावितरणच्या सहाय्यक अभियंत्याला केबिनमध्ये शिरून मारहाण

April 21, 2026
मनपा कर्मचाऱ्याला बुलेटने उडवले, अपघातानंतर चालक फरार,
1xbet russia

मनपा कर्मचाऱ्याला बुलेटने उडवले, अपघातानंतर चालक फरार,

April 21, 2026
शेअर मार्केटमधील गुंतवणुकीच्या नावाखाली ३९ लाखांची ऑनलाईन फसवणूक
1xbet russia

शेअर मार्केटमधील गुंतवणुकीच्या नावाखाली ३९ लाखांची ऑनलाईन फसवणूक

April 21, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच

April 21, 2026
बसस्थानकात चोऱ्या सुरूच, आरोग्यसेविकेची सोनपोत लंपास

जळगावात महावितरणच्या सहाय्यक अभियंत्याला केबिनमध्ये शिरून मारहाण

April 21, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon