पाचोरा (प्रतिनिधी) – येथील गो.से. हायस्कूलला लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंती आणि वृक्षारोपण सोहळा संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार दिलीप वाघ आणि जिल्हा शिक्षणाधिकारी बी.जे.पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त यांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले.यावेळी हायस्कूलच्या प्रांगणात अध्यक्ष माजी आमदार दिलीप वाघ , जिल्हा शिक्षणाधिकारी बी.जे.पाटील,संस्थेचे चेअरमन संजय वाघ,व्हा.चेअरमन व्ही.टी. जोशी, शालेय समितीचे चेअरमन खलील देशमुख, तांत्रिक विभागाचे चेअरमन वासुदेव महाजन, संचालक सतीश चौधरी, प्रकाश पाटील ,संचालिका जिजाबाई पाटील यांचे हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. जिल्हा शिक्षणाधिकारी बी.जे.पाटील आणि शालेय समितीचे चेअरमन खलील देशमुख यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी व्यासपीठावर मुख्याध्यापक सुधीर पाटील,भडगाव येथील सु.गि. पाटील विद्यालयाचे मुख्याध्यापक विश्वासराव साळुंखे , उपमुख्याध्यापिका पी.एम.वाघ, पर्यवेक्षक आर. एल.पाटील, एन. आर.ठाकरे आणि ए. बी.अहिरे, तांत्रिक विभाग प्रमुख एस. एन. पाटील, किमान कौशल्य विभाग प्रमुख मनिष बाविस्कर, कार्यालयीन अधीक्षक अजय सिनकर आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेश कौंडिण्य केले तर आभार अजय अहिरे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.









