जळगाव (प्रतिनिधी) – शिवसेना जळगाव महानगरतर्फे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त 161 कोरोना योद्ध्यांना 1 वर्षाचे विमा संरक्षण देण्यात येणार असून वितरण पालकमंत्री ना गुलाबराव पाटील यांच्या हस्ते होणार आहे.

वर्षभरापासून अनेक रुग्णवाहिकाचालक , खाजगी सुरक्षा रक्षक , सफाई कर्मचारी व कोरोना काळात ज्यांनी योगदान दिले अशा 161 कोरोना योद्ध्यांना 1 वर्षाचे विमा संरक्षण (रुपये 1 लक्ष) देण्यात येणार आहे.
या विमा पॉलिसीचे वितरण पालकमंत्री ना गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात येणार आहे यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेना सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, माजी आमदार प्रा चंद्रकांत सोनवणे, जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, माजी महापौर नितिन लढ्ढा, महापौर जयश्री महाजन, महानगर प्रमुख शरद तायडे, सुरेश चौधरी ( माजी नगराध्यक्ष धरणगाव), विरोधी पक्षनेते सुनील महाजन उपस्थित राहणार आहेत. उपस्थितीचे आवाहन उपमहानगर प्रमुख प्रशांत सुरळकर यांनी केले आहे. 31 जुलैरोजी हे विमा पॉलिसी वितरण तरुण कुढापा चौक , नेरी नाका येथे करण्यात येणार आहे असे संयोजकांनी सांगितले.







