जळगाव (प्रतींनिधी) – भडगाव तालुक्यातील पळासखेडा येथे झालेल्या गोळीबार झाल्याची घटना सकाळी 9 वाजेच्या सुमारास घडली असून या गोळीबारात एक जण जखमी झाला आहे. जखमीला उपचारार्थ जिल्हा सामान्य रुग्णलयात हलविण्यात आले आहे.


भडगाव तालुक्यातील पळासखेडा येथील अशोख शिवाजी पाटील (वय 45) या व्यक्तीवर गोळीबार झाला असून सदर संशयीत आरोपीने चार राऊंड फायर केल्या आहेत. शेत रस्त्यावरुन बैलगाडी नेल्याच्या कारणावरुन हा वाद झाला असून गोळीबार करणारा संशयीत आरोपी हा जखमीचा सख्खा चुलत भाऊ आहे. जखमीवर गोळीबार केल्या नंतर जखमीचा भाऊ किशोर शिवाजी पाटील आणि आई सुशीलाबाई शिवाजी पाटील यांना देखील संशयित आरोपीने मारहाण केली . या संदर्भात पुढील तपास पोलिस करीत आहेत.







