जळगाव (प्रतिनिधी) – पाकिस्तानी सैन्य पलीकडून गोळ्या झाडत असताना भारतीय जवान मुहतोड जवाब देत होते. कारगिल युद्धामुळे पाकिस्तानला चांगला धडा मिळाला. त्यावेळी सुरु असलेला गोळीबार, त्याचे कानठळ्या बसणारे आवाज आजही धडकी भरवतात असे प्रतिपादन १८ महाराष्ट्र बटालियन एनसीसीचे प्रशासकीय अधिकारी लेफ्टनंट कर्नल एम.एच. निशित यांनी केले.
येथील जिल्हा मराठा विद्याप्रसारक संस्थेच्या नूतन मराठा महाविद्यालयात संरक्षण शास्त्र व एनसीसी विभागाच्या संयुक्त विद्यमाने कारगिल विजय दिवस साजरा करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एल. पी. देशमुख हे होते. यावेळी संरक्षणशास्त्र विभागाच्या विद्यार्थ्यांनी प्रश्नोत्तराद्वारे सहभाग घेत कारगिल युद्धाविषयी माहिती लेफ्टनंट कर्नल निश्चित यांचेकडून जाणून घेतली. भारतावर हल्ला करण्याचा प्रयत्न करणाऱ्या पाकिस्तानचा आपल्या सैनिकांनी धुव्वा उडवला याचा सार्थ अभिमान सर्व भारतीयांना आहे. पाकिस्तानने हे कृत्य हेतुपुरस्कार व भारताची क्षमता किती आहे हे ओळखण्यासाठी हे युद्ध केले होते. निशीत स्वतः कारगिल युद्धात सहभागी होते. त्यामुळे त्यांनी त्यांचे प्रत्यक्ष अनुभव सांगितले.
प्रास्ताविक शिवराज पाटील यांनी केले. यावेळी उपप्राचार्य डॉ.एन. जे पाटील, डॉ. एस. ए. गायकवाड, प्रा,आर. बी. देशमुख, प्रा. राजेंद्र देशमुख, प्रा अनिल वाघ, डॉ डी.आर चव्हाण तसेच महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक उपस्थित होते. सूत्रसंचालन घनश्याम पाटील यांनी तर आभार धनंजय रायसिंग यांनी मानले.