जळगाव (प्रतिनिधी) – येथील विद्यमान उपसरपंच विलास राजाराम पाटील (भामरे) यांनी शासकीय जागेवर अतिक्रमण केलेल्या घरात राहात असल्याचे निदर्शनास आल्याने जिल्हाधिकारी अभिजित राऊत जळगाव यांनी तक्रारदार दिपक विजयसिंग परदेशी (सोनू परदेशी ) यांच्या बाजूने निकाल देत सामनेवाला यांचा अर्ज अवैध ठरवत सदस्य पदावरुन अपात्र घोषीत केले होते. त्यावर विलास पाटील यानी अप्पर आयुक्त यांच्याकडे अपील दाखल केले होते यावर आज दि. 26 जुलै रोजी सुनावणी होऊन अप्पर आयुक्त नाशिक यानी जिल्हाधिकारी जळगाव अभिजित राऊत यांच्या निर्णयाला दि 20 आँगस्ट पावेतो स्थगिती दिली आहे

तक्रारदार यांचेकडून अॅड.गजानन जाधव यांनी यांनी कामकाज पाहिले.







