• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्याहस्ते पिंप्री व खर्दे येथे विविध विकासकामांचे लोकार्पण व भूमिपुजन

अहिरे व उखळवाळी रस्त्यावर होणार 4.50 कोटींचा पूल

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 26, 2021
in जळगाव
0

धरणगाव (प्रतिनिधी) – धरणगाव तालुक्यातील पिंप्री खुर्द आणि खर्दे येथे विकासकामांचे लोकार्पण आणि भूमिपुजन सोहळ्यात पालकमंत्री बोलतांना म्हणाले की, गावाच्या विकासकामात कोणतेही राजकारण न आणता कामे करा, यासाठी जनतेत राहून आपल्या जनहिताची कामे करण्याचे आवाहन केले.

पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या प्रयत्नांनी मंजूर केलेल्या पिंप्री खुर्द आणि खर्दे येथे विविध विकासकामांचे लोकार्पण आणि भूमिपुजन करण्यात आले. यात पिंप्री येथे ग्राम निधीतून पेव्हर ब्लॉक-१० लक्ष; चौदाव्या वित्त आयोगातून भूमिगत गटार-१० लक्ष; अनुसुचीत जाती व नवबौध्द घटकांचा वस्तीचा विकास करणे अंतर्गत पोहच रस्ते व अंतर्गत रस्ता कांक्रीटीकरण ११ लक्ष; मुलभूत सुविधांच्या अंतर्गत (२५/१५) योजनेच्या अंतर्गत पेव्हर-११ लक्ष आणि कॉंक्रीटीकरण-६ लक्ष अशा एकूण ४८ लाख रूपयांच्या कामांचे भूमिपुजन करण्यात आले. यातील रस्ता कॉंक्रिटीकरण आणि २५/१५ योजनेतील पेव्हर ब्लॉक ही कामे आधीच सुरू करण्यात आले असून उर्वरित कामांचे ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते भूमिपुजन करण्यात आले.

याप्रसंगी बोलनांता ना. गुलाबराव पाटील म्हणाले की, मतदारसंघातील कामांसाठी निधीची कोणतीही कमतरता पडू देणार नाही. खरं तर विकासकामांमध्ये कुणीही राजकारण आणू नका. गावात एकोप्याने कामे करा. ग्रामीण पातळीवर लोकप्रतिनिधींनी जनतेच्या कायम संपर्कात राहून त्यांच्या अडचणी समूजन घेत त्यांचे निराकरण करण्याला प्राधान्य दिले पाहिजे. अर्थात, आपला लौकीक वाढवत असतांना आपल्या पक्षाचा प्रचार व प्रसार देखील करावा असे आवाहन पालकमंत्र्यांनी याप्रसंगी केले. तर श्रीराम मंदिराच्या सभा मंडपासाठी निधी देण्याचे आश्‍वासन देखील ना. गुलाबराव पाटील यांनी दिले.

यानंतर खर्दे येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यामध्ये खर्दे ते साळवा या सुमारे पाच किलोमीटर रस्त्याची साडे पाच मीटर इतके रूंदीकरण करून त्याचे डांबरीकरण करण्यात आले आहे. यासाठी तब्बल अडीच कोटी इतका खर्च लागला असून या पूर्ण झालेल्या रस्त्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्याहस्ते लोकार्पण करण्यात आले. तर, बाभळे ते कामतवाडी या तीन किलोमीटरच्या रस्त्यासाठी १ कोटी ३५ लक्ष रूपयांची तरतूद करण्यात आली असून याचे भूमिपुजन पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमात खर्दे येथील सरपंच कैलास पाटील यांनी कोरोनाच्या काळात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

खर्दे येथे ना. गुलाबराव पाटील म्हणाले की, गावातील व्यायामशाळा आणि नदीवरील पुलाच्या कामाचा आपण पाठपुरावा करत आहोत. उखळवाडी ते अहिरे या गावांच्या दरम्यान असणार्‍या पुलासाठी तब्बल साडे चार कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली असून याचे काम लवकरच सुरू होणार आहे. तर खर्दे ते कुरणपाट ते बाभळे या रस्त्याला दर्जोन्नत करण्यात येणार असल्याची ग्वाही देखील त्यांनी दिली.

याप्रसंगी ना. गुलाबराव पाटील म्हणाले की, मतदारांचे प्रेम हे माझे शक्तीपीठ आहे. त्यांच्याकडून आम्हाला सातत्याने काम करण्यासाठी प्रेरणा मिळत असते. यातून ग्रामीण भागातील रस्ते कामांना गती देण्यात आली असून याच्या माध्यमातून शहरी आणि ग्रामीण भागातील दरी मिटण्यास मदत होणार आहे. यावेळी उपजिल्हा प्रमुख पी.एम. पाटील, सरपंच भगवान महाजन, सुनिल बडगुजर यांनी व जिल्हा परिषद सदस्य गोपाल चौधरी यांनी मनोगत व्यक्त केली.

याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य गोपाल चौधरी, शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख पी. एम. पाटील, खर्दे सरपंच कैलास पाटील पिंप्री सरपंच सरलाताई बडगुजर, परिसरातील सरपंच भगवान महाजन, गणेश पाटील, रमेश पाटील, सुदर्शन पाटील, धनराज पाटील, गोरख पाटील मार्केटचे माजी सभापती प्रमोद पाटील , उपसरपंच मंगल पाटील, सा.बा.चे उप अभियंता मुकेश ठाकूर, शाखा अभियंता सी. व्ही. महाजन, एस. ए. सपकाळे, माजी सभापती अनिल पाटील, दिपक सोनवणे, भगवान महाजन, डी ओ पाटील, ग्रा. पं. सदस्य सुनिल बडगुजर सर , कमलताई बच्छाव, ईश्वर बच्छाव, शिवाजी महाजन, भोद सरपंच राजू पाटील, डी.पी. मनोरे, सुनिल बोरसे यांच्यासह पदाधिकारी व लोकप्रतिनिधी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी सभापती दिपक सोनवणे यांनी केले. सूत्रसंचालन बाळू सपकाळे यांनी केले तर आभार उपसरपंच मंगलअण्णा पाटील यांनी मानले.


 

 

Previous Post

कारगिल विजय दिवसाच्या दिवशी अमळनेरात माजी सैनिकांना अद्ययावत सभागृह बांधून मिळावे हि मागणी

Next Post

जिल्हास्तरीय लोकशाही दिन 2 ऑगस्ट रोजी ऑनलाईन होणार

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

जिल्हास्तरीय लोकशाही दिन 2 ऑगस्ट रोजी ऑनलाईन होणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जिल्हाधिकारीपदाचा रोहन घुगे यांनी स्वीकारला पदभार
1xbet russia

चारा उत्पादनासाठी वैरण बियाण्यांचा लाभ घ्या

March 13, 2026
डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात ‘नो स्मोकिंग डे’ निमित्त जनजागृती कार्यक्रम
1xbet russia

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात ‘नो स्मोकिंग डे’ निमित्त जनजागृती कार्यक्रम

March 13, 2026
भरधाव कारचे थरारनाट्य, डिव्हायडर, वीज खांबासह रिक्षालाही दिली धडक
1xbet russia

भरधाव कारने पाच जणांना उडवले; गंभीर जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू

March 13, 2026
हलगर्जीपणाने काम केल्याने ग्रामपंचायत विभागातील कनिष्ठ सहाय्यक निलंबित
Uncategorized

अनियमितता, कर्तव्यात निष्काळजीपणा : कर्तव्यात कसूर केल्यामुळे २ कर्मचारी निलंबित

March 13, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जिल्हाधिकारीपदाचा रोहन घुगे यांनी स्वीकारला पदभार

चारा उत्पादनासाठी वैरण बियाण्यांचा लाभ घ्या

March 13, 2026
डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात ‘नो स्मोकिंग डे’ निमित्त जनजागृती कार्यक्रम

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात ‘नो स्मोकिंग डे’ निमित्त जनजागृती कार्यक्रम

March 13, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon