जळगाव (प्रतिनिधी) – सध्या शिवसेनेचे शिवसंपर्क अभियान राबविण्यात येत असून या शिवसंपर्क अभियानाची सुरुवात पारोळा येथून झाली आहे. पक्ष संघटन वाढविण्यासाठी व आगामी न.पा. ,जि.प, पं.स.च्या निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन जिल्ह्यात शिवसेनेने मोठे फेरबदल देखील केले आहेत.

यात पारोळा येथील डॉ. हर्षल माने यांना जिल्हा प्रमुख पद दिल्यामुळे एरंडोल, पारोळा, चाळीसगाव , भडगाव, पाचोरा तालुक्यात शिवसेनेची निश्चितच ताकद वाढणार आहे, त्यासाठी डॉ. माने यांनी कंबर कसले असून गाव तिथे शिवसेना हे ध्येय त्यांनी डोळ्यासमोर ठेवले आहे. डॉ. माने यांच्याकडून आपल्या भागात दररोज शिवसंपर्क अभियानाअंतर्गंत मेळावे बैठका घेण्यात येत असून तरुणांची एक चांगली फळी तयार करण्यात त्यांना यश येत असल्याचे दिसून येत आहे. डॉ. माने यांच्या नियुक्तीमुळे पक्षात तरुणांची इनकमिंग सुरु झाली असून तरुणांसाठी डॉ.माने हे गळ्यातील ताईत बनले आहेत.

नुकताच चाळीसगाव येथे झालेल्या शिवसंपर्क बैठकीला देखील जोरदार प्रतिसाद मिळाला असून पातोंडा येथे झालेल्या शिवसंपर्क अभियांनात डॉ. माने यांनी तरुणांची मोट बांधली आहे. याप्रसंगी जळगाव जिल्हा सहसंपर्कप्रमुख गुलाबराव वाघ, चाळीसगाव शहर उप.जिल्हाअध्यक्ष आर.एल.नाना पाटील, जिल्हासन्वयक महेंद्रबाप्पू पाटील, ता.प्रमुख रमेशआबा चव्हाण, शहरप्रमुख नाना कुमावत, विधानसभा क्षेत्रप्रमुख भीमराव नाना कलाने, तालुका संघटक सुनील गायकवाड, उप तालुका प्रमुख अनिल राठोड, उप तालुका प्रमुख तुकाराम मामा पाटील, उप तालुका प्रमुख नाना शिंदे, तालुका प्रवक्ता दिलीप घोरपडे, उप तालुका शहरप्रमुख ज्ञानेश्वर पाटील, महिला आघाडी उप.जिल्हाप्रमुख प्रतिभा पवार, महिला तालुका प्रमुख सविता कुमावत, एस.टी.कामगार सेनाप्रमुख दिलीप पाटील, युवासेना तालुका संघटक सागर पाटील, युवासेना शहरप्रमुख चेतन कुमावत, विभागप्रमुख शैलेंद्र सातपुते, उप.जिल्हासमन्वय धर्मा काळे, सर्व जिल्हा प्रमुख, तालुकाप्रमुख, उपतालुका प्रमुख, शहर प्रमुख, शाखा प्रमुख व शिवसैनिक उपस्थित होते.
दरम्यान नवनियुक्त चाळीसगाव अल्पसंख्याक शहरप्रमुख वसीम चेअरमन यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.







