अमळनेर (प्रतिनिधी) – खा. शिक्षण मंडळाच्या श्रीमती द्रौ.रा. कन्याशाळेची स्थापना २३ जुलै १९४४ ला झाली.प्रतिमा पूजन व दीपप्रज्वलन शाळेचे चेअरमन हरी वाणी यांनी करून कार्यक्रमाची सुरुवात केली.


प्रस्ताविकात श्री.रवींद्र पाटील यांनी लॉकडाऊन मध्ये पहिल्यांदा विद्यार्थी विना वर्धापन साजरा होतोय अशी खंत व्यक्त केली. तर शिक्षक प्रतिनिधी विनोद कदम यांनी शिक्षकांना ऑनलाईन क्लासेससाठी शाळेत वायफाय उपलब्ध करून देण्याची मागणी केली. शाळेचे चेअरमन व प्रमुख पाहुणे हरी वाणी यांनी वर्धापन दिनी शालेय उपयोगी सर्व मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिले. त्याच बरोबर शाळेची गुणवत्ता अशीच राहण्यासाठी अजून प्रयत्न करावे असे सांगितले.
शाळेच्या मुख्याध्यापिका यांनी भांडारकर कुटुंबाच्या दातृत्वा ची आठवण करून दिली तर द्रौ.रा. कन्याशाळेच्या ग्रामीणभागातील विद्यार्थिनिंनी यावर्षी निकालात बाजी मारल्याचे सांगितले. कोरना लवकर संपून येणाऱ्या काळात विद्यार्थी शाळेत येवो ही प्रार्थना केली. सूत्रसंचालन सौ. बाविस्कर यांनी केले.तर आभारप्रदर्शन श्रीमती शेवळे यांनी केले. कार्यक्रम यशस्वीततेसाठी सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी बंधू भगिनींनी परिश्रम घेतले.







