वडती ता. चोपडा (प्रतिनिधि) – खाजगी ठेकेदाराकडे ओडण्याचे काम करीत असताना अचानक विजप्रवाह सुरू झाल्याने एका मजूराचा विजेचा झटक्याने जागेवरच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली यात ठेकेदार व महावितरणच्या कर्मचा-यांचा चुकी मुळे हि घटना घडल्याचे नातेवाईकांकडून आरोप केला गेला आहे.

याबाबत सविस्तर असे घोडगाव ता. चोपडा येथील मजूर काल दि. २१ जुलै रोजी यशवंत प्रभाकर कोळी (वय ३९ ) हे घोडगांवहून मजूरांसह विद्यूततारांचे कामानिमित्त शिरपूर तालूक्यातील दहीवद शिवारातील नंदू बावीस्कर यांच्या शेतात विजजनयंत्र व विजवाहक जोडण्याच्या कामास गेले असता त्या ठिकाणी काम सुरू असतांना . अचानक विजप्रवाह सुरू झाला व त्यातच यशवंत कोळी यांना विजेचा जोरदार झटका बसल्याने त्याना तात्काळ सोबत कामकरणा-या मजूरांनी शिरपूर येथील उपजिल्हा रूग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत्यू झाल्याचे घोषीत केले. हि दुर्दैवी घटना घडली त्यावेळी त्यांचा १५ वर्षाचा मुलां समोर हि घटना घडली आहे. काम करण्याआधी विजप्रवाह बंद करण्याचे महावितरणला सांगितले गेले होते. त्यानुसार ठेकेदाराने व महावितरने कडून काम बिनधास्त पणे सुरू करा असे सांगीतले गेले. परंतू काम करीत असतांना बंद केलेला विजप्रवाह अचानक सुरू होवून यशवंत कोळी यांना जबरदस्त झटका बसला यात ते मयत झाले.

जम्पर जोडणी करून महावितरणचे वायरमन विजेच्या खांबा वरून खाली उतरतांना दिसले. नतंर विजप्रवाह सुरू होताच हा दुर्दैवी अनर्थ घडला आहे. एवढा निष्काळजी पणा कसा होवू शकतो . कुठलेही काम करीत असताना सबस्टेशन वरून विजप्रवाह खंडीत करूनच काम केले जाते . नवीन विजेचे खांब उभे करून विद्यूत वाहक टाकायचे जरी काम असले तरी त्या जवळपासचा विजप्रवाह परमिट घेवून बंद केला जातो. तर मग कामकरीत असलेल्या विद्यूत वाहकमध्ये विजप्रवाह आला कसा ? विजप्रवाह बंद केला होता की नाही. केला होताच तर मग तो विजप्रवाह सुरू झालाच कसा ? असे अनेक प्रश्न यावेळी उपस्थीत होत आहेत. सर्व चुकी महावितरणचे कर्मचारी व ठेकेदाराची असून यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मांगणी मयताचा १५ वर्षीय मुलांने यावेळी केली आहे . यावेळी शिरपूर शहर पोलीस्टेशनेचे प्रभारी पो. नि. गणेश पड,सह पोलीस कर्मचारी घटनास्थळी पोहचले होते. रात्री उशीरा पर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
मुलां समोर बाप गतप्राण झाल्याने या दु:खद घटनेमुळे
घोडगाव गावात सर्वत्र शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त केले जात आहे. मयतास पत्नी, एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे. घराचा कर्ता पुरूष गेल्याने पोटापाण्याचा प्रश्न परिवारांवर समोर उभा राहीला आहे .







