विकास महाजन , कजगाव

कजगाव, ता. भडगाव :- येथे डेंग्यू चे थैमान थांबता थांबत नसल्याचे चित्र दिसून येत आहे यापूर्वीच सहा रुग्ण आढळून आल्यानंतर आता पुन्हा दोन रुग्ण आढळून आले आहेत त्यामुळे गावात मोठ्या प्रमाणावर भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे कजगाव येथील जीन परिसर हा डेंग्यू चा हॉटस्पॉट ठरत आहे जीन परिसरात आज पून्हा दोन रुग्ण आढळुन आले आहेत संजय जयराम महाजन यांचा पंधरा वर्षीय मुलगा प्रथमेश संजय महाजन व संजय चिंधा महाजन यांची तेरा वर्षीय मुलगी पूनम संजय महाजन ह्या दोघांना डेंग्यू झाल्याचे आढळून आले आहे त्यांना पुढील उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे वारंवार आढळून येणाऱ्या डेंग्यू रुग्णाबाबत गावात एकच चर्चेचा विषय झाला आहे, त्यामुळे ह्या वाढत्या डेंग्यू रुग्णा बाबत त्वरित उपाय योजना राबवून डेंग्यू बाबत विशेष नियोजन करावे अशी मागणी जोरदार होत आहे.
“””:जीन परिसर ठरतोय डेंग्यू हॉटस्पॉट
दरम्यान कजगाव येथे डेंग्यूचे सत्र सुरू असल्याने नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे त्यातच कजगावात एकूण आठ पेक्षा अधिक रुग्ण आढळून आले आहेत. दोन रुग्ण इतर भागातील तर उर्वरित सर्वच रुग्ण हे जीन परिसरातील आहेत त्यामुळे डेंग्यू चा हॉटस्पॉट ठरणाऱ्या जीन परिसराकडे जास्त लक्ष देण्याची गरज असल्याची प्रतिक्रिया स्थानिकांमधून व्यक्त होत आहेत.
साचलेले पाणी, डबके येथे डास भक्षक गप्पी मासे सोडण्यात यावे. ज्या भागामध्ये वाढ झालेली आहे. तेथे कीटकनाशक फवारणी घरोघरी करण्यात यावी तसेच धूर फवारणीचे कार्य मागणीनुसार करण्यात यावे.तसेच संबंधीत प्रशासनाने डेंग्यू सारख्या आजारावर त्वरित नियंत्रण मिळवण्यासाठी उपाय योजना कराव्यात. – विनोद हिरे स्थानिक नागरिक जीन परीसर







