जळगाव (प्रतिनिधी) – येथील आसोदा रेल्वेगेट जवळ एका अनोळखी महिलेला रेल्वेचा धक्का लागून ती मृत्युमुखी पडल्याची घटना बुधवारी दि. २१ जुलै रोजी सकाळी ९. ३० वाजता उघडकीस आली आहे. महिलेची ओळख पटविण्याचे काम पोलीस करीत आहेत.

आसोदा गेट जवळ खंबा क्रमांक ४२२/१८ ते २० दरम्यान या महिलेचा मृतदेह आढळला. हि महिला ३० ते ३५ वयोगटातील असून कचरावेचक असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.रेल्वे ट्रॅकमन योगेश पाटील, प्रकाश कुमावत यांना सदर महिला मृतावस्थेत दिसली. त्यांनी रेल्वे पोलिसांना माहिती देऊन मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात शवविच्छेदनकामी पाठविला. तिला डोक्याला मार लागल्यामुळे मृत्यू आला असावा असे प्रथमदर्शनी दिसत आहे. पुढील तपास पोलीस करीत आहे.







