जळगाव (प्रतिनिधी) – शिक्षकशिक्षकेतर कर्मचाऱ्यांना राज्यशासनाने सातव्या वेतन आयोग्याच्या फरकाचे पाच टप्पे करून दरवर्षी ते संबंधित कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधीत जमा करणार होते. पण तसे झालेले दिसत नाही. मासिक वेतन प्रत्येक महिन्याच्या एक तारखेला खात्यावर जमा होणे अपेक्षित असताना २,३ महिने विलंब होवूनही अनेक शाळांचे वेतन अजून नाहीत लेखाविभागाकडून नियोजन बिघडले आहे. अर्थ विभागाकडून वर्ष भराच्या वेतननिधीची तरतूद व्हायला हवी. ती हात उसनवारी प्रमाणे प्रत्येक महिन्याला केली जाते.कर्मचाऱ्यांच्या फरकाच्या रक्कम, वैद्यकीय देयके मंजूर होऊवू नही नाशिक उपसंचालक कार्यालय तसेच जळगाव वेतन पथकाकडे वर्षभरापासून पडून आहेत.पाठपुरावा केला असता शासनाकडे निधी नाही असे उत्तर मिळतात. तरी संबंधितांवर कारवाई होणे गरजेचे आहे .

आता १ जुलैला होणारी वेतन वाढ हि केंद्रीय कर्मचाऱ्यांन प्रमाणे अकरा टक्क्के द्यावी. केंद्राप्रमाणे राज्यशासन वेतनवाढ देत असते, कमी वाढ किंवा विलंबाने असे करून शिक्षकशिक्षकेतर कर्मचाऱ्यावर अन्याय होणार नाही. याची काळजी घ्यावी अश्या मागणीचे निवेदन भाजपा शिक्षक आघाडी कडून केले जात आहे. जिल्हाध्यक्ष भाजपा शिक्षक आ.म.जळगाव प्रवीण जाधव व पदाधिकारी यांनी मुख्यमंत्री व अर्थमंत्री म.रा.यांचे कडे केली आहे.







