जळगाव (प्रतिनिधी) – जळगाव शहरात भटक्या कुत्र्यांचा उच्छाद सुरूच असून मंगळवारी देखील ५ जणांना वेगवेगळ्या ठिकाणी कुत्रे चावल्यामुळे उपचारासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी दाखल करावे लागले होते.


सकाळी गवंडी कामगार संजय भिवसन गायकवाड (वय २३) रा. तांबापुरा हा कामावरून घरी पायी जात होता. त्यावेळी भिलवाडी परिसरात शबरीमाता नगर येथे एका भटक्या कुत्र्याने उजव्या पायाला चावा घेत त्याला गंभीर जखमी केले. तर दुसऱ्या घटनेत हुजेर जुबेर मुजावर (वय १२) रा. शिवाजी नगर, हुडको याला घराकडे जात असताना भटक्या कुत्र्याने हल्ला करीत उजव्या पायाच्या पोटरीला चावा घेत जखमी केले. यासह कार्तिक दिनेश जाधव (वय ११), तुषार कुमावत, शंकर नन्नवरे (वय २६) यांनाही कुत्रा चावल्याने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी आणण्यात आले होते.
कुत्र्यांच्या उच्छाद वाढल्याने नागरिक त्रस्त झाले आहे. महापालिका मात्र उपाययोजना करण्यासाठी कमी पडत आहे.







