अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांचा सत्कार

जळगाव (प्रतिनिधी) – महानगर पालिकेच्या अग्निशमन विभागाने कालिकामाता मंदिराच्या चौकात टायरला आग लागलेल्या टँकरला वेळेत पोहोचून आग विझवली आणि पुढील अनर्थ टाळला. म्हणून अस्मि फाउंडेशनचे अध्यक्ष तथा नगरसेवक अमित काळे यांनी सोमवारी १९ जुलै रोजी अग्निशमन विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना शाल, श्रीफळ देऊन सन्मानित केले.
मनमाड येथून जळगावकडे आलेला इंधनाचा टॅंकर कालिकामाता मंदिर चौक येथे १६ जुलै रोजी जात असताना टँकरच्या टायरला अचानक आग लागली. त्यावेळी नगरसेवक अमित काळे त्यांच्या सहकाऱ्यांसह तेथून जात होते. त्यामुळे त्यांनी तात्काळ अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्यांना संपर्क साधून घटनेची माहिती दिली होती. अग्निशमन विभागाने तात्काळ हजर होऊन आग विझवली. पर्यायाने होणारा पुढील अनर्थ टळला. त्यामुळे अमित काळे यांनी अग्निशमन विभागाचं कौतुक म्हणून व प्रोत्साहन म्हणून सोमवारी शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान केला. यामध्ये विभागाचे प्रमुख शशिकांत बारी, अश्वजीत घरडे, सोपान जाधव, देविदास सुरवाडे, सुनील मोरे, प्रकाश चव्हाण, राजपाल पाटील, गंगाधर कोळी, पन्नालाल सोनवणे, नितीन बारी, तेजस जोशी, जया दुबे, अनिता माळी यांना सन्मानित करण्यात आले.
यावेळी अस्मि फाऊंडेशनचे संजय निकम, निरंजन महाजन, अमरेलीवाला, धनंजय पाटील, चेतन छाजेड, रोहित करमचन्द, राहुल माळी, गौरव ठाकुर, अविनाश खेतमाळीस उपस्थित होते.







