जळगाव (प्रतिनिधी) – धुळे येथील जिल्हा कारागृहातील दहा कर्मचाऱ्यांना पदोन्नती मिळाली असून त्यात २ जण सुभेदार म्हणून तर उर्वरित ८ हे हवालदार झाले आहेत. त्यात तीन जणांची जळगाव येथे नियुक्ती करण्यात आली आहे.
धुळे जिल्हा कारागृहातील दिलीप पवार यांना नाशिकरोड मध्यवर्ती कारागृह तर जनार्दन बोरसे याना नंदुरबार कारागृहात सुभेदार म्हणून पदोन्नती मिळाली आहे. यासह जे आठ कर्मचारी हवालदार झाले आहे, त्यात जळगाव येथे सुरेश सुकदेव निवारे, शिवाजी सदाशिव कासोदे, रमेश वामन हांडे यांना नियुक्ती दिली आहे. लवकरच ते रुजू होतील. जिल्हा कारागृह अधीक्षक पेट्रस गायकवाड यांनी त्यांचा सत्कार केला.