अमळनेर;- कोरोना या संसर्ग जन्य साथीच्या पार्श्वभूमीवर डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती सार्वजनिक उत्सवाच्या स्वरूपात साजरी न करता गोरगरीब लोकांना एक दिवसाच्या अन्नदानासाठी आर्थिक रक्कम देत डॉ .बाबासाहेब आंबेडकर सामाजिक परिषद व मित्र परिवारतर्फे ‘वर्धमान संस्कार धाम, मुंबई’, ‘गोक्षेत्र प्रतिष्ठान’ संचलित ‘श्रीमती भानूबेन गोशाळा अमळनेर’ यांचे माध्यमातून अकरा हजार लोकांना १४ एप्रिल रोजीचे दोनवेळचे अन्नदान करण्यात आले.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त सालाबादप्रमाणे उत्सव साजरा न करता दलित नेते रामभाऊ संदानशिव यांनी सामाजिक परिषद,मा.आ.कृषिभूषण साहेबराव पाटील व मित्र परिवाराच्या माध्यमातून अमळनेर शहरातील विविध मागास, गरीब,कष्टकरी वाडी,मोहल्ला, वस्त्यांवर सुरू असलेल्या अन्नदानाचा एक दिवसाचा खर्च करून डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी केली.डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्ताने अमळनेर मधिल फरशी पूल ,गांधलीपुरा परिसर येथिल नदीलगत अन्नक्षेत्र केंद्रावर तहसीलदार मिलिंद वाघ ,नगरसेवक नरेंद्र संदानशिव, सामाजिक कार्यकर्ते संतोष लोहेरे,प्रा.गणेश पवार,हमीद जनाब,प्रा.अशोक पवार,सामाजिक कार्यकर्ते रणजित शिंदे आदींच्या हस्ते अन्नदान वाटप करण्यात आले.असे एकूण १५ केंद्रांवर अन्न वाटप करण्यात आले.यावेळी नगरसेविका मायाबाई कैलास लोहेरे यांचेसहकार्य लाभले.सोशल डीस्टंसिंग, मास्क, सॅनिटायझर वापरण्याच्या नियमांचे पालन करून गरीब,गरजू लोकांना दोन वेळचे सकस जेवण १५ भोजन केंद्रांवर नियमित दिले जात आहे.
अन्नक्षेत्र योजनेसाठी श्रीमती भानूबेन शहा गोशाळा चे संचालक चेतन शहा, राजुभाई सेठ,चेतन सोनार, महेंद्र पाटील,प्रा अशोक पवार, डी.ए.धनगर,रणजित शिंदे, गोक्षेत्र प्रतिष्ठाण च्या अध्यक्षा मीना शहा, विक्रम पाटील, दिलीप डेरे, सतिष वाणी,सामाजिक कार्यकर्ते रणजित शिंदे,संजय शर्मा,रमेश धनगर, गोपाळ कुंभार,संजय गोलेच्छा,महेंद्र राजपूत, दिलीप पाटील,भिकुबाई पाटील यांच्या सह गोक्षेत्र प्रतिष्ठाण चे पदाधिकारी, सदस्य व असंख्य तरुण युवा कार्यकर्ते परिश्रम घेऊन सदर सेवाभावी उपक्रम यशस्वीपणे राबवित आहेत.