• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

लहान बालकांना न्युमोनिया प्रतिबंधक मोफत लसीकरणास सुरूवात

महापालिकेच्या सर्व आरोग्य केंद्रांवर न्युमोनिया प्रतिबंधक लस उपलब्ध

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 15, 2021
in जळगाव
0

जळगाव (प्रतिनिधी) – महापालिकेच्या वतीने बालकांसाठी न्यूमोकोकल कॉन्जुगेट लसीकरण (पीसीव्ही) सुरु करण्यात आले आहे. गुरूवार, दि. 15 जुलै रोजी सकाळी 11 वाजता जळगाव शहर महानगरपालिका संचलित राजर्षी श्री छत्रपती शाहू महाराज हॉस्पिटल येथे न्यूमोनिया लसीकरणाच्या सुरूवात प्रसंगी हे लसीकरण महापालिकेतर्फे मोफत केले जाणार असल्याची माहिती महापौर सौ.जयश्री सुनिल महाजन यांनी दिली. हे लसीकरण सकाळी 10 ते सायंकाळी 4 या वेळेत महापालिकेच्या सर्व आरोग्य केंद्रांवर उपलब्ध राहणार आहे, असे ही त्यांनी सांगितले. यावेळी महापालिकेचे रूग्णालय उपायुक्त श्री.शाम गोसावी, वैद्यकीय अधिकारी डॉ.राम रावलानी, डॉ.मनिषा उगले, रूग्णालयाचे व जळगाव शहर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.

बालकांना स्ट्रेप्टोकोकस न्यूमोनिया या विषाणुंमुळे न्यूमोनिया हा आजार होतो. या आजाराचे प्रमाण पाच वर्षाच्या आतील बालकांमध्ये जास्त असते. न्यूमोकोकल न्यूमोनिया हा श्वसन मार्गाला होणारा एक संसर्गजन्य आजार आहे. त्यामुळे फुफ्फुसांवर सूज येऊन त्यात पाणी भरु शकते व श्वास घ्यायला लहान मुलांना त्रास होतो. या आजाराची लक्षणे खोकला, श्वास घ्यायला त्रास होणे हे आहे. हा आजार टाळण्यासाठी लसीकरण हा सर्वात प्रभावी उपाय असून शासनाकडून महापालिकेला न्यूमोकोकल कॉन्जुगेट लस प्राप्त झाली आहे. ही लस सहा ते 14 आठवड्याच्या बाळासह नऊ महिन्याच्या बालकांना देण्यात येणार आहे. एक वर्षआतील लहान मुलांसाठी ही लस उपयुक्त व आवश्यक असून आरोग्य व बालकल्याण मंत्रालय तसेच पीसीव्हीच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार लसीचा पहिला डोस दीड महिन्याच्या किंवा सहा आठवडे वयाच्या बालकांनी, लसीचा दुसरा डोस साडेतीन महिन्याच्या किंवा 14 आठवडे वयाच्या बालकांनी व लसीचा तिसरा डोस 9 महिने वयाच्या बालकांनी घेतलाच पाहिजे. सर्व आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी आणि आरोग्य कर्मचार्‍यांना लसीकरणाचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. हे लसीकरण मोफत असून शासनाच्या सर्व आरोग्य केंद्रांवर न्यूमोनिया लस उपलब्ध आहे. न्यूमोनिया प्रतिबंधक एका लसीचे बाजारमूल्य सुमारे चार हजार रुपये असून सर्वसामान्य नागरिकांना हे आर्थिकदृष्ट्या परवडणारे नाही. जागतिक आरोग्य संघटना व तज्ज्ञांच्या मते कोरोनाची संभाव्य तिसरी लाट ही लहान मुलांकरिता धोकेदायक असून त्यापासून लहान मुलाचे संरक्षण करण्याकरिता शासनाद्वारे केले जाणारे हे लसीकरण नागरिकांकरिता महत्त्वाचे आहे. महापालिकेतर्फे ही लस मोफत उपलब्ध असून शहरातील अधिकाधिक नागरिक माता-भगिनींनी या सेवेचा लाभ घेऊन एक वर्षाआतील बालकांचे लसीकरण करवून घेण्याचे आवाहन महापौर सौ.जयश्री सुनिल महाजन यांनी यावेळी केले.


 

 

Previous Post

निंभोरा येथील नाल्यात वाहून गेली बैलगाडी ; महिला सुखरूप, पुरूषाचा शोध सुरू !

Next Post

पारोळ्यात वाळूमाफियाची तहसीलदारांना धक्काबुक्की तर त्यांच्या चालकास मारहाण

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

पारोळ्यात वाळूमाफियाची तहसीलदारांना धक्काबुक्की तर त्यांच्या चालकास मारहाण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सुरक्षा ठेवीवर खान्देशातील ११ लाख ५० हजार वीज ग्राहकांना ११ कोटींचा परतावा
1xbet russia

महावितरणच्या विविध सेवा, सौर योजनांचा लाभ तालुक्यात एकाच छताखाली उपलब्ध

September 23, 2026
दुबईच्या स्मरणिकांपासून साकारला अनोखा गणराय!
1xbet russia

दुबईच्या स्मरणिकांपासून साकारला अनोखा गणराय!

September 22, 2026
निंभोरा येथे घरफोडी; ५७ हजारांच्या चांदीच्या मूर्ती लंपास
1xbet russia

निंभोरा येथे घरफोडी; ५७ हजारांच्या चांदीच्या मूर्ती लंपास

September 22, 2026
एक स्वप्न समाजाच्या एकजुटीचे जळगावात साकार होणार भगवान परशुराम भवन!
1xbet russia

एक स्वप्न समाजाच्या एकजुटीचे जळगावात साकार होणार भगवान परशुराम भवन!

September 22, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

सुरक्षा ठेवीवर खान्देशातील ११ लाख ५० हजार वीज ग्राहकांना ११ कोटींचा परतावा

महावितरणच्या विविध सेवा, सौर योजनांचा लाभ तालुक्यात एकाच छताखाली उपलब्ध

September 23, 2026
दुबईच्या स्मरणिकांपासून साकारला अनोखा गणराय!

दुबईच्या स्मरणिकांपासून साकारला अनोखा गणराय!

September 22, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon