खामगाव (प्रतिनिधी) – खामगाव येथील छत्रपती शिवाजी नगरातील मराठा समाज सभागृहात अखिल भारतीय मराठा महासंघाची भव्य बैठक आयोजित करण्यात आली असून जिल्हाध्यक्षपदी संजय शिनगारे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
अखिल भारतीय मराठा महासंघ जिल्हा बुलढाणा व खामगाव येथील सर्व आजी-माजी पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या वतीने मराठा समाज सभागृह येथे नवीन बुलढाणा जिल्हाअध्यक्ष पदाचे नियुक्तीपत्र देण्याकरिता व नवनियुक्त पदाधिकार्यांचा सत्कार करण्याकरिता सभेचे आयोजन करण्यात आले होते या सभेच्या अध्यक्षस्थानी विनोदी लेखक खामगाव रत्न अखिल भारतीय मराठा महासंघाचे माजी जिल्हाध्यक्ष मराठा समाजाचे ज्येष्ठ नेते रामदादा मोहिते हे होते तर प्रमुख उपस्थितीत खामगाव नगरीचे माजी नगराध्यक्ष माजी जिल्हाध्यक्ष गणेश भाऊ माने तसेच जिल्हा संपर्कप्रमुख रमाकांतजी गलांडे मराठा सेवा मंडळाचे अध्यक्ष रामभाऊ बोंद्र चंद्रकांत रेठेकर माजी अध्यक्ष मराठा समाज सेवा मंडळ माजी जिल्हा उपाध्यक्ष नगरसेवक प्रवीण भाऊ कदम माजी शहराध्यक्ष राजेश भाऊ मुळीक हे होते सभा सुरू करण्यापूर्वी सर्वप्रथम राष्ट्रमाता राजमाता मा जिजाऊ व छत्रपती शिवराय यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे व मा जगदंबेचे पूजन करून तसेच माल्यार्पण करून मोठ्या प्रमाणात आतिषबाजी तसेच जय घोष करीत गगनभेदी घोषणा देऊन सुरुवात करण्यात आली त्यानंतर अखिल भारतीय मराठा महासंघाचे संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय आ. अण्णासाहेब पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आले.
उपस्थित प्रमुख मान्यवरांचे मराठा समाज बांधवांच्या वतीने मोठ्या थाटामाटात शाल श्रीफळ व पुष्पहार घालून स्वागत करण्यात आले त्यानंतर अखिल भारतीय मराठा महासंघाचे नवनियुक्त जिल्हाध्यक्ष संजय शिनगारे यांना कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी जिल्हाध्यक्ष रामदादा मोहिते यांच्या हस्ते व उपस्थित मराठा समाज बांधवांच्या वतीने अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय सरचिटणीस राजेंद्र कोंढरे व राष्ट्रीय उपाध्यक्ष विनायकराव पवार यांच्या सहीचे नियुक्तीपत्र देण्यात आले सोबतच त्यांचा शाल श्रीफळ पुष्पहार व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला सोबतच अखिल भारतीय मराठा महासंघाच्या नवनियुक्त महिला जिल्हाध्यक्ष अनिता तनपुरे यांचा व अखिल भारतीय मराठा महासंघाच्या नवनियुक्त शहराध्यक्ष सौ मिलनताई प्रवीण कदम, अखिल भारतीय मराठा महासंघाचे नवनियुक्त शहराध्यक्ष किशोर आप्पा भोसले यांचा उपस्थित समाज बांधवांच्या वतीने सस्नेह शाल व श्रीफळ पुष्पहार पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला याप्रसंगी कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा संपर्कप्रमुख रमाकांतजी गलांडे यांनी केले यानंतर नवनियुक्त महिला जिल्हाध्यक्ष श्रीमती अनिता ताई तनपुरे यांनी व नवनियुक्त जिल्हाध्यक्ष संजयजी शिनगारे यांनी सत्काराला उत्तर देतांना यांनी आपले मनोगत व्यक्त केले.