नवी दिल्ली (वृत्तसंथा) – चीनमध्ये कोरोन या विषाणूने थैमान घातले आहे. अनेक लोक यात दगावले. भारतातही याचा शिरकाव झाला आहे. सुरुवातीला कोरोनाचे रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली होती. दरम्यान आता पुन्हा भारतात आणखी दोन कोरोना व्हायरसचे रुग्ण आढळले आहे. नवी दिल्ली आणि तेलंगणा राज्यात हे कोरोनाग्रस्त रुग्ण असल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली आहे. यापूर्वी कोरोना विषाणूची लागण झाल्याच्या संशयावरून इतरांपासून पूर्ण वेगळे ठेवून उपचार करण्यात येत असलेल्या एका रुग्णाचा अर्नाकुलम वैद्यकीय महाविद्यालयाच्या इस्पितळात शुक्रवारी रात्री मृत्यू झाला.
दिल्ली येथे पॉझिटीव्ह आढळेला रुग्ण हा इटलीतून भारतात आलेला आहे. तर, तेलंगणातील रुग्ण हा दुबईतून आला आहे. सध्या या दोन्ही रुग्णांची प्रकृती स्थीर असून त्यांना डॉक्टरांच्या निगरानीत ठेवण्यात आले आहे. तसेच, त्यांच्यावर योग्य ते उपचार सुरू आहेत.
कन्नूर जिल्ह्यातील असलेला हा ३६ वर्षांचा रुग्ण शुक्रवारी रात्री मलेशियातून विमामाने घरी परतला होता. न्युमोनिया, फुप्फुसाचा तीव्र संसर्ग व उच्च मधुमेहामुळे त्याला इस्पितळात दाखल केले गेले होते. या आधीही केरळमध्ये कोरोना विषाणूचा संसर्ग झालेले तीन रुग्ण आढळले होते. ते चीनमधून आले होते. त्यांच्यावर उपचार करण्यात आले. त्यानंतर ते बरे झाले. नंतर त्यांच्यात कोरोनाची लक्षणे न आढळल्याने घरी पाठविण्यात आले.