जळगाव – जन्मत: बाळाला श्वास घेण्यास त्रास सोबतीला काविळही झाल्याने बाळाची तब्येत गंभीर होती, त्याच्यावर रुग्णालयातील बालरोग विभागातील एनआयसीयूत दाखल करुन घेत तातडीने उपचार करण्यात आले, या प्रि-मॅच्युअर बाळाचे तातडीने तज्ञांनी केलेल्या उपचारामुळे जीव वाचला.
भुसावळ येथील इम्रान पिंजारी यांच्या पत्नीची नऊ महिने पूर्ण होण्यापूर्वी प्रसूती झाली झाली होती, परिणामी बाळ श्वास घेऊ शकत नव्हते, त्याला श्वास घेण्यास त्रास होत होता, हे डॉक्टरांच्या लक्षात आले तसेच त्याला काविळही झाला होता, वजनही कमी होते यामुळे तात्काळ त्या प्रि-मॅच्युअर बाळाला डॉ.उल्हास पाटील रुग्णालयातील एनआयसीयूमध्ये अॅडमिट करत व्हेंटीलेटर लावण्यात आले सोबतच जीवनरक्षक औषध दिली. यात फुफुसांच्या वाढीसाठी आवश्यक असलेल्या औषधांचा समावेश होता जेणेकरुन सहा दिवसातच बाळ आयसीयूतून बाहेर आले. बाळाला चोवीस तास निरीक्षणाखाली ठेवण्यात आले. कारण अशा बाळांमध्ये जीवंत राहण्याची शक्यता फार कमी असते कारण त्यांची आंतरिक शरिरातील वाढ पाहिजे तेवढी न झाल्याने गुंतागुंत झालेली असते मात्र डॉ.उल्हास पाटील रुग्णालयातील तज्ञ डॉक्टरांच्या टिमला यश मिळत असून काही दिवसातच बाळाचे वजन ही वाढून बाळ धोक्याबाहेर आले. खाजगी इस्पीतळात बाळावरील या उपचारासाठी साधारणत: एक ते दीड लाख रुपये लागतात मात्र डॉ.पाटील रुग्णालयात महात्मा ज्योतिबा फुले योजनेंतर्गत इम्रान पिंजारी यांच्या बाळावर मोफत उपचार झाले असून त्यांनी रुग्णालयाचे आभार मानले. डॉ.उल्हास पाटील रुग्णालयातील बालरोग विभागात तज्ञ डॉक्टरांच्या टिम असून त्यात डॉ.सुयोग तन्नीरवार यांच्या मार्गदर्शनानुसार डॉ.उमाकांत अणेकर, डॉ.अनंत बेंडाळे, डॉ.सुयोग तन्नीरवार, डॉ.विजय गरकल यांच्यासह रेसिडेंट डॉक्टरांनी उपचार केले.
प्रिमॅच्युअर बाळावर २४ तास लक्ष ठेवणे गरजेचे — डॉ. सुयोग तन्नीवार
कमी दिवसात जन्माला आलेल्या बाळावर २४ तास लक्ष ठेवून योग्य औषधोपचार व ऑक्सीजनची आवश्यकता असल्यास योग्य प्रमाणात पोहचले तर असे बेबी धोक्याच्या बाहेर येउन वाचू शकते.डॉ. उल्हास पाटील रूग्णालयात ही सर्व व्यवस्था एकाच छताखाली उपलब्ध करून देतांना तज्ञ डॉक्टरांची टीम २४ तास कार्यरत असल्याने हे शक्य झाले आहे.