जळगाव (प्रतिनिधी ) ;- जळगाव येथील दालमिल व्यापा-यांची फसवणूक केल्या प्रकरणी अजुन दोघांना अटक करण्यात आली आहे. या गुन्ह्यात निलेश वल्लभभाई सुदाणी (सुरत) यास यापुर्वीच अटक करण्यात आली आहे. या फसवणूकीच्या गुन्ह्यातील दाळीचा माल विकणारा व विकत घेणारा अशा दोघांना एमआयडीसी पोलिस स्टेशनच्या तपास पथकाने सुरत येथून अटक केली आहे. 20 फेब्रुवारी 2021 रोजी या फसवणूक प्रकरणी एमआयडीसी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एमआयडीसी परिसरातील दालमिल व्यापारी सिद्धार्थ नवरतन जैन, सत्यनारायण रामप्रसाद बाल्दी, दिनेश रामविलास राठी, पुष्पक अरविंद मनियार, अविनाश किशोर कक्कड, किशोरचंद चंचलचंद भंडारी या सहा दाळ व्यापा-यांकडून प्रमुख एंटरप्रायजेस व प्रमुख ट्रेडींग कंपनी सुरत यांनी अनुक्रमे प्रविणभाई व मुकेशभाई अशी नावे सांगून जीएसटी क्रमांक व बॅंक स्टेटमेंट दाखवत विश्वास संपादन करुन विविध प्रकारच्या डाळी मागवल्या होत्या.
यातील रमेशचंद तेजराज जाजू यांच्याकडून 16 लाख 89 हजार 950, सिद्धार्थ नवरतन जैन यांच्याकडून 2 लाख 63 हजार 970, सत्यनारायण रामप्रसाद बाल्दी यांच्याकडून 2 लाख 37 हजार, दिनेश रामविलास राठी यांच्याकडून 9 लाख 36 हजार 90, पुष्पक अरविंद मणीयार यांच्याकडून 1 लाख 31 हजार 15, अविनाश कक्कड यांच्याकडून 2 लाख 70 हजार व किशोरचंद्र भंडारी यांच्याकडून 10 लाख 38 हजार 863 रुपयांचा असा एकुण 45 लाख 66 हजार 888 रुपयांचा विविध दाळीचा माल मागवण्यात आला होता. माल मिळाल्यानंतर मालाचे पैसे न देता फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर याप्रकरणी एमआयडीसी पोलिस स्टेशनला याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्हा रमेशचंद्र तेजराज जाजू रा. गणपती नगर जळगाव यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गु.र.न. 100/21 भा.द.वि.406, 409, 420, 34 अन्वये दाखल करण्यात आला होता.
या तपासात सर्वप्रथम निलेश वल्लभभाई सुदाणी सुरत यास अटक करण्यात आली होती. इतर फरार आरोपी केतन मिताभाई कपुरिया, अरविंद क्याडा (सुरत), मुकेश देवशीभाई कथोरोटीया , मुकेश देवशीभाई कथोरोटीया सुरत यांचा शोध सुरुच होता.