एलसीबीच्या पथकाची २४ आत कारवाई
जळगाव (प्रतिनिधी ) ;- शेदुर्णी ते पहुर रोडवरील गोंदेगाव गावाजवळील दरोडयातील ‘चौकडीला एलसीबीच्या पथकाने २४ तासात ताब्यात घेतले आहे.
याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी कि, पहुर पोलीस स्टेशनला शेदुर्णी ते पहुर रोडवरील गोंदेगाव गावाजवळ ३० जून २०२१ रोजी रात्री दशरय बागुल वय – ३५ धंदा – ड्रायव्हर रा.दहीवद ता.चाळीसागाव यांची आयशर गाही क्रमांक एमएच – १० डब्ल्यू ७३५ ला अडवून पाच अनोळखी व्यक्तींनी दुचाकी आडवी लावून वाहनांच्या काचा फोडून ६ हजाराचे नुकसान करून ड्रायव्हर आणि क्लिनरला मारहाण केली होती.
याबाबत पहुर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलीस अधीक्षक डॉ. प्रविण मुंढे, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, अपर पोलीस अधीक्षक सचिन गोरे यांनी सदर गुन्हा उघडकीरा आणणेकरीता स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांना सुचना व मार्गदर्शन केले होते.त्यानुसार पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांनी स्थानिक गुन्हे शाखेकडील स.फौ.अशोक महाजन, शरीफ काझी, युनुस शेख,किशोर राठोड, विनोद पाटील, रणजित जाधव, पोहेकॉ. इंद्रीस पठाण यांना पदुर येथे रवाना केले होते. पथकाने जामनेर, पहुर , पाचोरा इत्यादी ठिकाणी तपास केला असता शुभम प्रकाश बारी वय – २० रा.वाही दरवाजा, शैदुर्णी, ता.जामनेर,2) रोशन दत्तात्रय बडगुजर वय -19 रा.सोयगाव रोड,पाण्याच्या टाकीजवळ, शेंदुर्णी ता.जामनेर, 3) गोरख वापु पाटील वय -19 रा.वाडी दरवाजा,गेदुर्णी.ता. जामनेर, अक्षय प्रकाश पाटील वय 20 रा. संजयदादा नगर,शेदुर्णी ता.जामनेर यांना ताब्यात घेतले असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यांच्याकडून दुचाकी हस्तगत करण्यात आली असून चौघांना पहूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.