जामनेर ;- तालुक्यातील खादगाव येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्र ,गुरुदेव सेवा आश्रम ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने हरित क्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांच्या जयंती व डॉक्टर्स डे चे औचित्य साधून वृक्षारोपण करण्यात येऊन जामनेर शहरातील डॉक्टरांना गौरवण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ.अमोल शेठ तर प्रमुख अतिथी म्हणून गुरुसेवा आश्रम ट्रस्टचे अध्यक्ष श्याम चैतन्य महाराज,तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेश सोनवणे,वैद्यकीय अधीक्षक डॉ.विनय सोनवणे हे होते.
जामनेर आयएमएचे अध्यक्ष डॉ. आर.के.पाटील यांच्या हस्ते प्रतिमा पुजन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. श्यामचैतन्य महाराज व डॉ.राजेश सोनवणे यांनी मनोगत व्यक्त केले. प्रसंगी गुरुदेव सेवा आश्रम ट्रस्ट द्वारे सर्व डॉक्टरांना गौरविण्यात आले व 100 विविध वृक्षांची लागवड डॉक्टरांच्या हस्ते करण्यात आली.कार्यक्रम प्रसंगी डॉ.अमृता कोलते-पाटील,डॉ.चारुशीला ठाकूर,डॉ.महेंद्रसिंग चव्हाण,डॉ.हर्षल चांदा, डॉ. प्रशांत पाटील,डॉ.नंदलाल पाटील,डॉ.प्रशांत महाजन,डॉ.नीलकंठ पाटील,डॉ.दीपक ठाकूर,डॉ.रमेश पाटील,डॉ.संदीप पाटील,डॉ.मनोज विसपुते,डॉ.सतीष पाटील,डॉ.योगेश इंगळे, डॉ.आशिष महाजन,डॉ.प्रमोद पाटील,डॉ.अविनाश कुरकुरे, डॉ.निलेश काळे,डॉ.चंद्रशेखर पाटील,डॉ.राजेश नाईक . डॉ सागर पंडीत.डॉ.विजय सपकाळ . पद्माकर चोधरी. संदिप पाटिल . श्रीराम पाटील . सह उपस्थित होते.डॉ.पराग पाटील यांनी सूत्रसंचालन केले तर डॉ.विनोद भोई यांनी आभार मानले.
ग्रामपंचायत,ग्रामस्थ, आशा स्वयंसेविका,आरोग्य कर्मचारी खादगाव यांचे सहकार्य लाभले.