जळगाव (प्रतिनिधी ) ;- तालुक्यातील विटनेर येथे एकावर ६ जणांनी धारदार शस्त्राने वार करून जखमी केल्याची घटना आज २ जुलै रोजी रात्री १ वाजेच्या सुमारास घडली असून जखमीला उपचारासाठी जिल्हा वैद्यकीय महाविद्यालय येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी कि, विजयसिंग भावसिंग परदेशी यांच्या डोक्यावर रामधन संजय परदेशी ,राजेंद्र भावसिंग परदेशी ,संजय भावसिंग परदेशी ,अलका संजय परदेशी ,पवन राजेंद्र परदेशी,.रविंद्र राजेंद्र परदेशी सर्व रा. विटनेर यांनी अचानक धारदार कोयत्याने व लोखंडी रॉडने मारहाण केली. यात ते गंभीर जखमी झाल्याने त्यांना उपचारासाठी असुन जिल्हा सामान्य रुग्णालय उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे . याबाबत एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.