• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

ओबीसी आरक्षण जिल्हा परिषद निवडणुका पुढे ढकलणार का?

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 2, 2021
in महाराष्ट्र
0

मुबंई (वृत्तसंस्था) – सर्वोच्च न्यायालयाने ओबीसींचं राजकीय आरक्षण रद्द केल्यानंतर राज्यातील नागपूर, अकोला, वाशिम, धुळे आणि नंदूरबार या जिल्हा परिषदा आणि त्या अंतर्गत येणाऱ्या पंचायत समित्यांचा पोटनिवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. महाराष्ट्र सरकारनं कोरोना विषाणू संसर्गाची तिसरी लाट आणि डेल्टा प्लस वेरिएंटचे रुग्ण या पार्श्वभूमीवर पोटनिवडणुका 6 महिने लाबंणीवर टाकण्यासाठी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे. राज्य सरकारच्या याचिकेवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. सुनावणीमध्ये काय निर्णय होणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.

महाराष्ट्र सरककारनं सध्या राज्यात कोरोना महामारीचं संकट आहे. केंद्र सरकारनं डेल्टा प्लस वेरिएंट अधिक संक्रामक असल्याचा इशारा दिलेला आहे. राज्यात सध्या तिसऱ्या टप्प्यातील निर्बंध लागू आहेत सार्वजनिक ठिकाणी लोकांना जमा होण्यास मनाई करण्यात आलेली आहे. या कारणांमुळे 5 जिल्हा परिषद आणि त्यांअंतर्गत येणाऱ्या पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुका 6 महिने लांबणीवर टाकण्याची याचिका केली आहे.

महाराष्ट्र सरकारनं सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यापूर्वी पोटनिवडणुका लांबणीवर टाकण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाकडे पत्रव्यवहार केला होता. मात्र, सुप्रीम कोर्टाचे निर्देश असल्याशिवाय पोटनिवडणुका लांबणीवर टाकता येणार नाहीत, असं महाराष्ट्र सरकारला कळवलं होतं. त्यानंतर राज्यानं सुप्रीम कोर्टाकडे याचिका दाखल केली होती. राज्याच्या याचिकेवर आज सुनावणी होत आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार रिक्त झालेल्या पदांच्या निवडणुका सर्वसाधारण प्रवर्गातून घेण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार महिला आरक्षणाची सोडत काढण्यात आली. त्याचबरोबर या पोटनिवडणुकांसाठी 27 एप्रिल 2021 रोजी मतदान केंद्रनिहाय मतदार यादीदेखील प्रसिद्ध करण्यात आली होती. सर्वोच्च न्यायालयाने 22 मार्च 2021 रोजीच्या निर्णयानुसार राज्य निवडणूक आयोगाने सुरु केलेली ही प्रक्रिया पुढे चालू ठेवण्याचे आदेश दिले होते; परंतु राज्य शासनाने 19 मार्च 2021 रोजीच्या पत्रान्वये राज्यातील कोविड- 19 ची परिस्थिती आयोगाच्या निदर्शनास आणून दिली होती. या परिस्थितीचा विचार करता निवडणूक प्रक्रिया दोन महिन्यांसाठी स्थगित करणे आवश्यक असल्याबाबत आयोगाने न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले होते. कोविड-19 च्या परिस्थितीवर सतत लक्ष ठेवून आयोगाने समयोचित निर्णय घ्यावा, असे न्यायालयाने त्यासंदर्भात 30 एप्रिल 2021 रोजी आदेश दिले होते, असेही ते म्हणाले.

29 जून 2021 ते 5 जुलै 2021 या कालावधीत नामनिर्देशनपत्र स्वीकारण्यात येतील. 4 जुलै 2021 रोजी रविवार असल्याने नामनिर्देशनपत्र स्वीकारण्यात येणार नाहीत. नामनिर्देशनपत्रांची छाननी 6 जुलै 2021 रोजी होईल. नामनिर्देशनपत्रासंदर्भातील निवडणूक निर्णय अधिकाऱ्याच्या निर्णयाविरुध्द जिल्हा न्यायाधिशांकडे 9 जुलै 2021 पर्यंत अपील दाखल करता येईल. अपील नसलेल्या ठिकाणी 12 जुलै 2021; तर अपील असलेल्या ठिकाणी 14 जुलै 2021 पर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येतील. 19 जुलै 2021 रोजी सकाळी 07.30 ते सायंकाळी 05.30 या वेळेत मतदान होईल. 20 जुलै 2021 रोजी मतमोजणी होईल, असेही श्री. मदान यांनी सांगितले.


 

 

Previous Post

पाचोरा कॉग्रेसच्या सोशल मीडिया विधानसभा अध्यक्ष राहुल शिंदे यांची निवड

Next Post

इंधन दरवाढीविरोधात राष्ट्रवादीचे दोन दिवस आंदोलन – जयंत पाटील

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

इंधन दरवाढीविरोधात राष्ट्रवादीचे दोन दिवस आंदोलन - जयंत पाटील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नागपूर राज्यस्तरीय सेपक टकरॉ स्पर्धेसाठी जळगाव जिल्ह्याचा संघ जाहीर
1xbet russia

नागपूर राज्यस्तरीय सेपक टकरॉ स्पर्धेसाठी जळगाव जिल्ह्याचा संघ जाहीर

June 13, 2026
अल्पवयीन तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या
1xbet russia

यावल तालुक्यातील १७ वर्षीय मुलीची गळफास घेऊन आत्महत्या

June 13, 2026
शेताच्या बांधाच्या वादातून मारहाण; दोघांविरुद्ध गुन्हा
1xbet russia

शेताच्या बांधाच्या वादातून मारहाण; दोघांविरुद्ध गुन्हा

June 13, 2026
यावलमध्ये बालमजुरीचा पर्दाफाश
1xbet russia

यावलमध्ये बालमजुरीचा पर्दाफाश

June 13, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

नागपूर राज्यस्तरीय सेपक टकरॉ स्पर्धेसाठी जळगाव जिल्ह्याचा संघ जाहीर

नागपूर राज्यस्तरीय सेपक टकरॉ स्पर्धेसाठी जळगाव जिल्ह्याचा संघ जाहीर

June 13, 2026
अल्पवयीन तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या

यावल तालुक्यातील १७ वर्षीय मुलीची गळफास घेऊन आत्महत्या

June 13, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon