पारोळा-;- येथील श्री व्यंकटेश माध्यमिक विद्यालयाचे लिपिक सुधाकर पवार यांना सेवानिवृत्ती निमित्ताने निरोप देण्यात आला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष रावसाहेब भोसले तर प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे सचिव हेमंत पाटील व उपाध्यक्षा सरिता भोसले , भागवत संदानशिव ,मुख्याध्यापिका सुनंदा पाटील हे उपस्थित होते.
याप्रसंगी सुधाकर पवार यांचा संस्थेच्या वतीने सेवापूर्ती निमित्ताने सपत्नीक सत्कार करण्यात आला. या सेवापूर्ती च्या कार्यक्रमा निमित्ताने बोलताना संस्थेचे अध्यक्ष रावसाहेब भोसले म्हणाले की सुधाकर पवार यांनी २६ वर्ष लिपिक पदावर काम करीत असताना ते प्रामाणिक पणे केले शाळेच्या व संस्थांच्या वाटचालीत त्यांना मोठा वाटा राहिला. त्यांनी या पदावर प्रामाणिकपणे काम केल्याच्या भावना त्यांनी व्यक्त केल्यात. तर संस्थेचे सचिव हेमंत पाटील यांनी लिपिक वर्ग म्हणजे शाळेचा कणा शिक्षक व विद्यार्थी यांचा दुवा असल्याचे सांगत सुधाकर पाटील यांनी २६ वर्ष सेवाकाळात शाळेचे हित जोपासत सर्वना मार्गदर्शकाची भूमिका त्यांनी साकारल्याचे बोलून दाखविले.
यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका सुनंदा पाटील यांनी लिपिक सुधाकर पवार यांच्या कार्यकाळाचा गौरव करीत शाळेचे सर्व कामे वेळेवर बिनचूक पार पाडल्याचे बोलुन दाखविले यावेळी शिक्षक सतिश शामनाणी ,सुनिल शामनाणी ,उद्धव पाटील ,शुभांगी पाटील ,राहूल सुर्यवंशी ,शरद देवरे यांनी सुधाकर पवार यांच्या सोबत असलेल्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी भानुदास पाटील ,रविंद्र चव्हाण उपस्थित होते.
यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उद्धव पाटील यांनी तर आभार राहुल सूर्यवंशी यांनी मानलेत यशस्वीतेसाठी योगेश पारधी , सुनिता राठोड यांनी परिश्रम घेतले.