जळगाव ;- आज वीर क्रांतिकारी शहिद अब्दुल हमीद यांची जयंती निमित्त तांबापूर येथील शामा फायर संकुल समोर चौक ला क्रांतिकारी वीर शहिद अब्दुल हमीद यांचा नाव देवून फलक अनावरणचे उदघाटन जळगाव महानगरी चे महापौर जयश्री महाजन यांचेहस्ते फीत कापून चौकाचे फलक अनावरण झाले. यावेळी नगरसेवक सादिक खाटीक, नगरसेवक प्रशांत नाईक, इकरा शिक्षण संस्थेचे सचिव एजाज अहमद मलीक,माजी नगरसेवक डॉ रिजवान खाटीक, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्यांक विभाग (प्रदेश सरचिटणीस) सलीम इनामदार, रियाज काकर, साहिल पटेल,जमील भंगार वाले,वसीम बापू, जब्बार एजंट, असिफ अन्वर, नईम भाई, युसूफ भाई बुलेट, अकील मेम्बर,अस्लम काकर, उमर भाई काकर, इरफान भाई शेख. या उदघाटन चे कार्यक्रमात एजाज मलिक यांनी भारत देशा तर्फे पाकिस्तान चे टँक उडवून पाकिस्तान चे धजज्या उडवून देणाऱ्या या भारतीय सैनिकांचे चौकाला नाव दिल्याबद्दल आयोजकांचे आभार व्यक्त केले, व पुढची पिढीला त्यांचे देशासाठी बलिदानची आठवण राहील. कार्यक्रम चे अध्यक्ष भाषणात सौ जयश्री ताई ने ही शाहिद अब्दुल हमीद यांचे बलिदान भारत देश कधी ही विसरणार नाही गौरवउदगार काढले. कार्यक्रम चे शेवटी सलमान खाटीक यांनी पाहुण्यांचे आभार मानले.