नागपूर (वृत्तसंस्था) – राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा वाढतच आहे. नागपूमध्ये आज एकूण १४ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. हे सर्व कोरोनाबाधित रुग्ण दिल्लीच्या मरकजमधून आल्याची माहिती मिळते आहे. एकाच दिवसात नागपूरमध्ये १४ रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली आहे. त्यामुळे नागपूर महानगर पालिकेने रुग्ण सापडलेला परिसर पूर्णपणे सील केला आहे.दरम्यान, राज्यात गेल्या २४ तासामध्ये १३४ रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. त्यापैकी सर्वाधिक ११३ रुग्ण मुंबईतच आढळले आहेत. तर राज्यात कोरोनाबाधितांची संख्या १ हजार ८९५ वर पोहचली आहे. मागील २४ तासात मालेगाव, नागपूर, मुंबई, मीरा भाईंदर,नवी मुंबई, ठाणे, वसई आणि विरारमध्ये कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशभरात २४ तासात ९०९ कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. तर २ हजार अहवाल अजून येणे बाकी आहे. मागील २४ तासात कोरोना विषाणूमुळे ३४ जणांचा मृत्यू झाला आह. तर आतापर्यंत या विषाणूमुळे २७३ जणांना आपले प्राण गमवावे लागले आहे. तर, आतापर्यंत भारतात आतापर्यंत कोरोनाबाधितांची संख्या ८ हजार ३५६ वर पोहचली आहे. त्यापैकी ७ हजार ३६७ जणांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.