पुणे (वृत्तसंस्था) – कोरोना विषाणूविरोधात लढण्यासाठी शासनाच्या बरोबरीने अनेक मदतीचे हात पुढे येत असून पुणे सराफ असोसिएशनच्या वतीने कोरोनाच्या संकटावर मात करण्यासाठी मुख्यमंत्री सहायता निधीसाठी २१ लाख रुपयांचा धनादेश विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.सध्या कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव देशातील सर्व राज्यांमध्ये झाला आहे. हा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात राज्य शासनामार्फत व्यापक उपाययोजना राबविण्यात येत आहेत. कोरोना बाधित रुग्णांवर उपचार करणे, गोरगरीब मजूर, स्थलांतरित कामगार यांची निवास आणि भोजनाची व्यवस्था करणे, सर्व ठिकाणांची स्वच्छता करुन जंतुनाशकांची फवारणी करणे यांसारख्या अनेक उपाययोजना राबविण्यात येत आहेत. या पार्श्वभूमीवर पुणे सराफ असोसिएशनकडून मुख्यमंत्री सहायता निधीस मदत करण्यात आली आहे.यावेळी पुणे सराफ असोसिएशनचे अध्यक्ष फत्तेचंद रांका, सेक्रेटरी अमृत सोलंकी, खजिनदार कुमारपाल सोलंकी, माणिकलाल बलडोट, उगम गुंदेचा, गौतम सोलंकी, कांतीलाल ओसवाल, फुलचंद ओसवाल, नेमीचंद कोरमता उपस्थित होते.