दिल्ली (प्रतिनिधी) – इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री संस्थेतर्फे ‘फिक्की’ अर्थात एफआयसीसीआय, फेडरेशन हाऊस, नवी दिल्ली येथे 26 फेब्रुवारी रोजी ‘शेतीत शाश्वत पाणी वापर व्यवस्थापनाद्वारे भविष्यातील गुंतवणूक’ या विषयावर परिषद आयोजित करण्यात आली होती. या परिषदेमध्ये जैन इरिगेशनला शाश्वत पद्धतीने पाण्याचा कार्यक्षमतेने वापर केल्याबद्दल गौरविण्यात आले. पंजाबमधील होशियारपूर कंदी प्रकल्प सौर तंत्रज्ञानावर आधारित एकात्मिक जलसंसाधन व्यवस्थापनाद्वारे यशस्वीपणे कार्यान्वित करण्यात आलेला आहे. या प्रकल्पाचा केस स्टडी असलेल्या पुस्तकाचे प्रकाशनही यावेळी करण्यात आले.
या कार्यक्रमास कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या अतिरिक्त सचिव अलका भार्गव, जलशक्ती मंत्रालयाचे सचिव यू. पी. सिंग हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. प्रमुख मान्यवरांच्याहस्ते जैन इरिगेशनच्या वतीने व्हाईस प्रेसिडेंड डॉ. संगिता लढ्ढा यांनी प्रमाणपत्र स्विकारले. जैन इरिगेशनचे ‘पाणी थेंबाने पीक जोमाने’ हे ब्रिद परिषदेचे ध्येय होते. परिषदेत पाणी बचतीचे तंत्रज्ञान, त्याचा शेतीतील वापर आणि आव्हाणे, शाश्वत पाणी वापराच्या पद्धतीत एकात्मीक दृष्टीकोन या विषयांवर विचार मंथन झाले. परिषदेत पाण्याच्या वापराची कार्यक्षमता वाढविणे आणि ठिबक सिंचनाचा वापर करणे यावर भर देण्यात आला. हे तंत्रज्ञान जैन इरिगेशनच्या ‘संशोधन आणि विकास’ विभागाने नाविन्यपूर्ण पद्धतीने विकसीत केले आहे. ‘रिसोर्स टू रूट’ ही एकात्मिक सिंचन पद्धतीचा विकास जैन इरिगेशनने केलेला असून यातून पाणी वापराची कार्यक्षमता वाढते.
जैन इरिगेशन व्यतिरिक्त या राष्ट्रीय परिषदेत इस्त्रायलच्या राजदूत कार्यालयातील अधिकारी, निती आयोगातील अधिकारी, जलसंसाधन मंत्रालयाचे अधिकारी, कॉर्टेवा अॅग्री सायन्स, ओलम, रिव्ह्यूलीस, टॅफे, डीएससीएल, आयसीआरआयईआर (इक्रीअर), इक्रीसॅट, दालमिया भारत फाउंडेशन आदींचे प्रतिनिधी सहभागी होते.
फोटो कॅप्शन- एफआयसीसीआयतर्फे आयोजित परिषदेमध्ये कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या अतिरिक्त सचिव अलका भार्गव यांच्याहस्ते प्रमाणपत्र स्विकारताना जैन इरिगेशनच्या व्हाईस प्रेसिडेंड डॉ. संगिता लढ्ढा. सोबत व्यासपीठावर जलशक्ती मंत्रालयाचे सचिव यू. पी. सिंग आदि.