मुंबई (वृत्तसंस्था) – भारतानं नुकतंच , दशलक्ष लोकांचं लसीकरण पूर्ण केलं आहे. हे लसीकरण अमेरिकेपेक्षाही अधिक आहे. यासंदर्भातील एक फोटो शेअर करत अमृता फडणवीस यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
विविध वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असणाऱ्या आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. लसीकरण संदर्भात त्यांनी केलेल्या ट्विटमध्ये, हो, मी भक्त आहे आणि त्याचा मला अभिमान आहे असं म्हंटलं आहे.
दरम्यान, भारतानं २८ जून रोजी सकाळी ८ वाजेपर्यंत ३२३.६६ दशलक्ष नागरिकांचं लसीकरण पूर्ण केलं आहे. ही संख्या अमेरिकेपेक्षाही अधिक आहे. अमेरिकेत ३२३.३३ दशलक्ष नागरिकांचं लसीकरण करण्यात आलं आहे. युनायटेड किंगडममध्ये या तारखेपर्यंत ७६.३२ दशलक्ष, तर जर्मनीतर ७१.४४, , फ्रान्समध्ये ५२.४६ आणि इटलीमध्ये ४९.६५ दशलक्ष नागरिकांचं लसीकरण करण्यात आलं आहे.