जळगाव (प्रतिनिधी ) ;- चाळीसगाव पोलीस स्टेशनला बलात्काराचा गुन्हा दाखल असलेल्या आरोपीला न्यायालयाने १० वर्षांची शिक्षा सुनावली होती . मात्र आरोपी हा शिक्षा सुनावल्यापासून फरार झाला होता. आरोपी हा चाळीसगावात हिरापूर रोड येथे असल्याची माहिती एलसीबीच्या पथकाला मिळाली होती . त्यानुसार आरोपी बंडू रमेश देशमुख रा. रामवाडी ता. चाळीसगाव याला एलसीबीच्या पथकाने अटक केली आहे.
याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी कि, आरोपी बंडू रमेश देशमुख रा. रामवाडी याच्याविरुद्ध १९९८ ला चाळीसगाव पोलीस स्टेशनला बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. बंडू देशमुख याला औरंगाबाद खंडपीठाने १० वर्षांची शिक्षा ठोठावली होती. आरोपीने दिल्ली येथे सुप्रीम कोर्टातही केस दाखल केली होती . मात्र सुप्रीम कोर्टानेही औरंगाबाद खंडपीठाच्या निर्णय कायम ठेवला होता. निकाल दिल्यापासून आरोपी बंडू देशमुख हा फरार झाला होता. एलसीबीचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्या पथकातील पौनी सुधाकर लहारे , सफौ अशोक महाजन,पोहेकॉ रामकृष्ण पाटील,सुधाकर अंभोरे, शरद भालेराव , भारत पाटील , वसंत लिंगायत यांनी आरोपीचा पुणे,नांदगाव,मुबई आदी ठिकाणी शोध घेतला होता. मात्र आरोपी हा चाळीसगावच्या हिरापूर रोड येथे आल्याची माहिती मिळाली होती त्यानुसार वरील पथकाने सापळा रचून त्यास ताब्यात घेतले आहे. जळगावच्या सत्र न्यायालयात हजर केले असता त्याला पुढील शिक्षेकरिता कारागृहात पाठविण्यात आले आहे.







