चोपडा तालुक्यातील वरगव्हाण येथिल घटना
धानोरा (प्रतिनिधी) – येथून जवळच असलेल्या वरगव्हाण येथे मयतावर अंतीम स्वस्कार करणेसाठी आलेपुरूष मंडळी प्रेत घेऊन स्मशानभूमीत गेले असता समाज प्रथेप्रमाणे सर्व महिला गाव जवळील हातपाय धुण्यासाठी गेल्या असतांना. शेजारीच असलेल्या एका बांधकामाच्या ओट्यावर महिला बसल्या असता ओट्यासह भिंत कोसळून एक महिला जागीच ठार झाली. तर तब्बल सहा महिला जखमी झाल्याची दुर्दैवी घटना मंगळवारी वरगव्हाण येथे संध्याकाळी सहाच्या सुमारास घडली.
याबाबत सविस्तर माहिती असे की,चोपडा तालुक्यातील वरगव्हाण येथे रामा रतन पावरा यांची सुन उषाबाई विजय पावरा यांचे निधन झाले होते.त्यामुळे नातेवाईक व आत्पेष्ट अंत्यसंस्कारासाठी जमलेले होते.मयत महीलेचे प्रेत अंत्यसंस्कारासाठी पुरूष मंडळी घेऊन गेले होते.ईकडे मरनघरी आलेल्या सर्व महीला समाज प्रथेप्रमाणे संध्याकाळी सहा वाजेच्या सुमारास गावहाळ वर गेल्या व काही महीला शेजारीच बांधकाम सुरु असलेल्या भिकन दमड्या पावरा यांच्या वट्यावर बसल्या असतांनाच अचानक ओट्यासह घराची भिंत पडली.व क्षणात होत्याचे नव्हते झाले यात जेलीबाई परशुराम बारेला ही अपंग महीला जागीच ठार झाली. तर त्यांच्यासोबत लालबाई मारसिंग पावरा,कुसुमबाई नरसिंग पावरा,कालुबाई प्रताप बारेला,बाकलीबाई भाईदास पावरा,जसुबाई शेवा पावरा,सायकाबाई भायला पावरा या गंभीर जखमी झाल्या घटना घडली तेव्हा सर्व पुरुष प्रेत यात्रेत गेले होते.मात्र गावाचे सरपंच भुषण पाटील, यांनी स्वतः घ्या गाडीत गंभीर महिलेला टाकत धानोरा प्रा.आ.केंद्रात आनले तेथे एकही डॉक्टर उपस्थित नव्हते.आरोग्य सेविका भिकूबाई बोदडे व भारती सोनवणे यांनी उपचार करत जखमींना उपचारासाठी जळगाव रवाना केले.तर याठिकाणी पं.स.चे उपसभापती सुर्यकांत खैरनार यांनी भेट दिली. घटनेची माहिती मिळताच तहसीलदार अनिल गावित,पं.स.चे गटविकास अधिकारी बी.एस.कोसोदे,ग्रा.पं.विस्तार अधिकारी जे.पी.पाटील तलाठी सरोवर तडवी यांनी घटना स्थळी भेट दिली.तर अडावद पोलिस स्टेशन चे सहायक पोलिस निरीक्षक किरण दांडगे यांनीही आपले सहकारी पाठवत पंचनामा केला असून मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी. रवाना केले.सदरील घटनेतील मयत व जखमी या अतिशय गरीब असून त्यांना शासकीय मदत मिळावी अशी मागणी होत आहे.