जळगाव : –शहरातील एमआयडीसी मधील कंम्पानीतून तांब्याच्या चोरी प्रकरणी दोन आरोपीना अटक करण्यात आली आहे.
घटनेच्या दिवशी चालक दिपक यशवंत चौधरी यास त्याच्या ताब्यातील व गुन्ह्यात वापरलेले वाहन मुद्देमालासह पोलिसांनी ताब्यात घेत अटक केली होती.तो सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. घटनेच्या दिवसापासून जिवन चौधरी (सुपरवायझर) व हितेश कोल्हे (कामगार) हे दोघे फरार झाले होते. पोलिस त्यांच्या मागावर होते. 2 लाख 52 हजाराचा मुद्देमाल तपासकामी हस्तगत करण्यात आला आहे. एमआयडीसी पोलिस स्टेशनचे पो.नि. शिकारे यांच्या सहका-यांनी दोघांना काल रात्री दहा वाजेच्या सुमारास शिताफीने ताब्यात घेत अटक केली. दोघांना न्या. ए.एस.शेख यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने दोघांना 1 जुलै पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.