भडगाव (प्रतिनिधी) – भडगाव तालुक्यातील कजगाव येथील फळ विक्रेता अनिस समद मण्यार यांच्या चारचाकी वाहनास अपघात होऊन यात गाडी मधील मण्यार यांची पत्नी,मुलगा व मण्यार हे जखमी झाले.
कजगाव येथील फळ विक्रेते अनिस समद मण्यार हे जळगाव माहेरी गेलेल्या पत्नी व मुलांना घेण्यास आपले वाहन( क्र. एम.एच.१९ सी.झेड.६५१९ ) ने गेले होते. जळगाव येथुन परीवारासह कजगाव येत असताना लासगावजवळ वळणावर झिमझीम पडत असलेल्या पावसामुळे व समोरून येणाऱ्या वाहनांच्या लख्ख प्रकाशामुळे त्यांचा वाहनावरील ताबा सुटल्याने वाहन पलटी झाले. यात अनिस मण्यार (वय २९ ) यांना डोक्यास मार लागला. पत्नी शाकिरा अनिस मण्यार (वय २८), मुलगा रोहन अनिस मण्यार (वय ५) हे जखमी झाले. पाठीमागून आलेल्या वाहनातून जखमींना पाचोरा येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.