जळगाव :- दारू पिण्याचे व्यसन असलेल्या आणि काहीच कामधंदा न करणाऱ्या पतीच्या त्रासाला कंटाळून रॉकेल ओतून आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या महिलेचा आज उपचारादरम्यान मृत्यू झाला असून आरोपी पतीला अटक करण्यात आली आहे.
सूत्रांनी दिलेली माहिती अशी कि, सुप्रीम कंपनीजवळ कधीकाळी चहाची टपरी चालवणारा संजय पाटील सध्या बेरोजगार होता. तो कोणताही कामधंदा करत नव्हता. त्याला दारु पिण्याचे व्यसन जडले होते. घरखर्च चालवण्यासाठी त्याची पत्नी रोजंदारीने कामाला जात होती. अशा परिस्थितीत तो पत्नीला माहेरुन नेहमी पाच हजार रुपये घेऊन येण्यास दबाव आणत होता. त्याच्याया त्रासाला त्याची पत्नी उज्वला पाटील वैतागली होती. पतीच्या नेहमीच्या त्रासाला वैतागून तिने 24 जूनच्या रात्री ७ वाजता रंगात टाकण्याचे थिनर अंगावर ओतून स्वत:ला जाळून घेतले होते. तिच्यावर डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय हॉस्पीटल व रुग्णालयात उपचार सुरु होते. उपचार सुरु असतांना 26 जून रोजी तिची मृत्यूशी झुंज संपली. त्यामुळे सामान्य रुग्णालयात तिची शव चिकीत्सा झाली. या प्रकरणी चेतन प्रकाश लाड यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार एमआयडीसी पोलिस स्टेशनला रितसर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास स.पो.नि. पोलिस उप निरीक्षक विजय गायकवाड करत आहेत.